‘महोगनीची लागवड’ शेतकऱ्यांसाठी ठरणार आर्थिक उन्नतीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:04 IST2021-09-23T04:04:41+5:302021-09-23T04:04:41+5:30

दिलीप मिसाळ गल्ले बोरगांव : परिसरातील शेतकरी शेतीबरोबरच दरवर्षी विविध वृक्षलागवड करतात. त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान मिळते. मात्र, आता ...

‘Mahogany cultivation’ will be a path to economic prosperity for farmers | ‘महोगनीची लागवड’ शेतकऱ्यांसाठी ठरणार आर्थिक उन्नतीचा मार्ग

‘महोगनीची लागवड’ शेतकऱ्यांसाठी ठरणार आर्थिक उन्नतीचा मार्ग

दिलीप मिसाळ

गल्ले बोरगांव : परिसरातील शेतकरी शेतीबरोबरच दरवर्षी विविध वृक्षलागवड करतात. त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान मिळते. मात्र, आता महोगनी वृक्षाची लागवड शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग घेऊन आली आहे. खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगांवमध्ये ५६ एकर क्षेत्रात शेतकऱ्यांनी महोगनीची लागवड आहे. त्यातून बारा वर्षांनंतर भरघोस उत्पन्न मिळणार आहे.

शेतकरी आपल्या जमिनीमध्ये साग, आंबा, मोसंबी, बांबू आणि पेरू अशा झाडांची लागवड करतात. आता आर्थिक समृद्धतेसाठी शेतकऱ्यांना ‘महोगनी’ या वृक्षाचा पर्याय मिळाला आहे. हे वृक्ष दक्षिण आफ्रिकेत मोठ्या संख्येने आढळतात. हे वृक्ष लाल, काळ्या, खडकाळ आणि मुरबाड अशा जमिनीत वाढते. झाड लावल्यानंतर १२ ते १३ वर्षांनंतर लाखाच्या पटीत उत्पन्न मिळते. ‘महोगणी’ हे जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या वृक्षांपैकी एक आहे. आपल्याकडील वातावरण या वृक्षास पोषक आहे. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक वृक्षलागवडीसाठी महोगणी वृक्षाचा समावेश करण्यात आला आहे.

चौकट...

बारा वर्षांत ८० फुटांपर्यंत सरळ वाढते

महोगनी वृक्षाची लागवड केल्यानंतर हे झाड १२ वर्षांत ६० ते ८० फूट सरळ वाढते तसेच खोडाच्या परिघाची वाढ एक मीटरपर्यंत होते. याच्या वाढीसाठी नैसर्गिक किंवा सेंद्रीय खताची आवश्यकता असते. या वृक्षाला परिपूर्ण होण्यासाठी १० किंवा अधिक वर्ष लागतात. १२ ते ४८ सेल्सिअस तापमानात हे झाड जगू शकते तसेच ७०० ते २००० मि.मी. पावसातसुद्धा हे झाड तगून राहते. कठीण लाकूड असल्याने यावर पाणी किंवा किडीचा परिणाम होत नाही.

चौकट...

फर्निचरपासून ते औषधी गुणधर्म

महोगनी वृक्षापासून संगीत वाद्य, कागद, नक्षीदार तावदान, आतील ट्रिम, फर्निचर यासाठी उपयोग केला जातो. याशिवाय फळे, पाने आणि फांद्यांचे अर्क हे कर्करोग, मलेरिया, रक्तक्षय, अतिसार आणि मधुमेह या रोगांवरील औषधांसाठी वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामुळे महोगनी वृक्षाची लागवड शेतकऱ्यांना अतिशय किफायतशीर ठरणार आहे.

चौकट

शेतकरी सक्षम बनतील

गल्ले बोरगावमध्ये आमच्यासह अनेक शेतकऱ्यांनी महोगनी वृक्षाची लागवड केली आहे. पुणे येथील एक रोपवाटिका घरपोच या वृक्षाची रोपे पोहोचवितात. बारा वर्षांत हे वृक्ष शेतकऱ्यांना आर्थिकरित्या सक्षम बनवतील. लागवडीनंतर याला जास्त खर्च येत नाही, अशी माहिती गल्ले बोरगांव येथील शेतकरी गणेश खोसरे, बाळासाहेब भोसले यांनी दिली.

फोटो :

220921\img-20210922-wa0063.jpg

'महोगनी' चे रोपे (झाडे) शेतकऱ्यांना वाटप करतांना

छायाचित्र दिलीप मिसाळ

Web Title: ‘Mahogany cultivation’ will be a path to economic prosperity for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.