भूम पालिकेत महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 00:15 IST2016-12-31T00:13:06+5:302016-12-31T00:15:52+5:30
भूम : नगर परिषदेच्या उपनगराअध्यक्षपदी संयोगिता गाढवे यांची बिनविरोध निवड झाली.

भूम पालिकेत महिलाराज
भूम : नगर परिषदेच्या उपनगराअध्यक्षपदी संयोगिता गाढवे यांची बिनविरोध निवड झाली. तर स्वीकृत सदस्य म्हणून धनंजय मस्कर व प्रशांत देवडीकर यांची वर्णी लागली .भूम पालिका सभागृहात न. प. अध्यक्षा सुप्रिया वारे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची बैठक झाली. नूतन उपनगराअध्यक्षा संयोगिता गाढवे व स्वीकृत सदस्य यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते तर कॉग्रेसचे दोन नगरसेवक उपस्थितीत होते.
भूम नगर परिषदेत आता नगराअध्यक्षा व उपनगराअध्यक्षा ह्या दोन्ही महिला असून तर राजकारणात महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्याने १७ पैकी नऊ महिला नगरसेवक असल्याने पालिकेत खऱ्या अर्थाने महिलाराज आले आहे या निवडीवेळी गटनेते संजय गाढवे, पालिका मुख्याधिकारी सुंदर बोंदर, नगर अभियंता गणेश जगदाळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)