केऱ्हाळ्यात माहेरच्या नातेवाइकांची सासरच्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:04 IST2021-09-03T04:04:06+5:302021-09-03T04:04:06+5:30

सिल्लोड : माहेर व सासर एकाच गावात असलेल्या सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळ्यात माहेरच्या नातेवाइकांनी सासरच्यांना बेदम मारहाण केली. जखमीला रुग्णालयात ...

Maher's relatives beat father-in-law in Kerala | केऱ्हाळ्यात माहेरच्या नातेवाइकांची सासरच्यांना मारहाण

केऱ्हाळ्यात माहेरच्या नातेवाइकांची सासरच्यांना मारहाण

सिल्लोड : माहेर व सासर एकाच गावात असलेल्या सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळ्यात माहेरच्या नातेवाइकांनी सासरच्यांना बेदम मारहाण केली. जखमीला रुग्णालयात नेत असताना पुन्हा हल्ला करून मारहाण करीत गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

केऱ्हाळा येथील शेख ईस्माईल शेख चाँद यांचा मुलगा शेख ईसराईल शेख ईस्माईल याचा विवाह गावातील शेख शब्बीर शेख वजीर यांची मुलगी शेख अंजुमशी सहा वर्षांपूर्वी झाला होता. घरात नेहमीच छोट्या-मोठ्या कारणांनी वाद होत होते. गुरुवारी असाच वाद झाल्याने शेख अंजुमच्या माहेरकडील नातेवाइकांनी शेख ईस्माईल व त्यांच्या परिवारातील सदस्यांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. ‘तुम्ही आमच्या मुलीला काही बोलायचे नाही, तिला त्रास दिला तर तुम्हाला जगू देणार नाही,’ असे म्हणून फिर्यादी शेख ईस्माईल शेख चांद यांची पत्नी तायराबी शेख ईस्माईल यांना काठी, दगडाने बेदम मारहाण करून डोके फोडले. याप्रकरणी शेख ईस्माईल शेख चांद यांच्या फिर्यादीवरून चार जणांवर सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

चौकट

रुग्णालयात नेताना पुन्हा केला हल्ला

मारहाणीत जखमी झालेल्या तायराबी यांना वाहनाद्वारे रुग्णालयात नेले जात हाेते. तेव्हा आरोपी अंजुम शेख ईसराईल, शेख शब्बीर शेख वजीर, शेख शहारुख शेख शब्बीर, शेख मुमताजबी शेख शब्बीर यांनी रस्त्यात गाडी अडवून दगडाने गाडीवर हल्ला केला. तसेच तायराबी यांना पुन्हा जबर मारहाण केली. यात जखमी झालेल्या तायराबी यांना सिल्लोड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Maher's relatives beat father-in-law in Kerala