महेंद्रऋषीजी महाराज यांचा दीक्षा दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:10 IST2021-02-05T04:10:19+5:302021-02-05T04:10:19+5:30
बजाजनगरातील जैन स्थानकात त्रिशला व नवकार महिला मंडळाच्या वतीने स्वागतगीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमनप्रभाजी म. सा., स्वर्णश्री ...

महेंद्रऋषीजी महाराज यांचा दीक्षा दिन उत्साहात
बजाजनगरातील जैन स्थानकात त्रिशला व नवकार महिला मंडळाच्या वतीने स्वागतगीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमनप्रभाजी म. सा., स्वर्णश्री म. सा., विभाश्रीजी म. सा. यांनी दीक्षादिनाचे अभिनंदन गीत गायले. उपप्रवर्तक अक्षयऋषीजी महाराज यांनी युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.
महेंद्रऋषीजी महाराज म्हणाले की, आई-वडिलांच्या पुण्याईमुळेच आज मी या धर्माच्या व्यासपीठावर आलो असून समाजाला दिशा देण्याचे काम गुरुकृपेने करीत आहे. आजघडीला पालक मुलांना धर्माचे शिक्षण देण्यास टाळाटाळ करीत असून मुले संन्यास घेतील या भीतीमुळे त्यांना गुरूंकडे पाठविले जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात पंढरपूर-बजाजनगर श्रावक संघाचे अध्यक्ष संतोष चोरडिया यांनी मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक चंद्रकांत चोरडिया, सूत्रसंचालन सविता लोढा, तर डॉ. प्रविण तातेड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किशोर राका, प्रकाश कोचेता, अजय दुग्गड, चेतन छाजेड, वर्षा कर्नावट, भारती गुगळे, आदींनी परिश्रम घेतले. बजाजनगरातील जैन स्थानकांच्या विस्तारित बांधकामाचे महेंद्रऋषीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.
फोटो ओळ
बजाजनगरात कार्यक्रमात समाजप्रबोधन करताना महेंद्रऋषीजी महाराज; समोर भाविक उपस्थित होते.