महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र आजही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:26 IST2018-12-29T23:26:13+5:302018-12-29T23:26:47+5:30
सुटीच्या दिवशी महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत.

महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र आजही सुरू
औरंगाबाद : महावितरणने वीज बिलाची शून्य थकबाकी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना सुटीच्या दिवशी वीज बिलाचा भरणा करण्यास अडचण येऊ नये म्हणून रविवारी सुटीच्या दिवशीही महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत.