महावितरणचे साहित्य दुरुस्ती अभियान

By Admin | Updated: May 29, 2014 00:22 IST2014-05-29T00:04:34+5:302014-05-29T00:22:59+5:30

हिंगोली : मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील महावितरणची प्रचंड हानी झाली होती.

Mahavitaran's Literary Amendment Campaign | महावितरणचे साहित्य दुरुस्ती अभियान

महावितरणचे साहित्य दुरुस्ती अभियान

हिंगोली : मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील महावितरणची प्रचंड हानी झाली होती. त्यात झालेली नुकसानाची दुरूस्ती तसेच वीजगळती आणि वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने साहित्य नूतनीकरणाची कामे हाती घेतली आहेत. प्रामुख्याने हिंगोली शहरात ६ किलोमीटर अंतरावर एअर बेंच केबल टाकण्यात आले असून २७ कन्डक्टर बदलण्यात आले आहेत. जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यापर्यंत १ लाख ३९ हजार ६७७ ग्राहकांची संख्या होती. एकूण पाच विभागात वसमतमध्ये सर्वाधिक कनेक्शन आहेत. त्याखालोखाल हिंगोली उपविभागात ३० हजार ८३४ ग्राहकांची नोंद करण्यात आली आहे. मुख्य कार्यालय असताना हिंगोली शहरात वीजगळती आणि चोरीचे प्रमाण कमी झालेले नाही. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असल्यामुळे महावितरणसमोर आव्हान निर्माण झाले आहे. म्हणून वाढत्या वीजचोरीला आळा घालण्यासाठी फ्लार्इंग स्कॉडची नेमणूक करण्यात आली होती. फ्लाईंग स्कॉडचे काम सुरू असतानाही वीजचोरी घटलेली नाही. परिणामी हातबल झालेल्या महावितरणच्या अधिकार्‍यांनी शेवटचा पर्याय म्हणून विद्युत तारांवर ‘एअर बंच केबल’ टाकण्याचा निर्णय घेतला आहे. चोरी अधिक असणार्‍या शहरातील सात नगरात १० किलो -मीटर अंतरावर गत महिन्यापासून केबल टाकल्या जात आहे. आजघडीला आझम कॉलनी, ख्वाजा कॉलनी, सिद्धार्थनगर, इंदिरानगर, खुशालनगर, गारमाळ आणि मंगळवारा भागात ६ किमीपर्यंत केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने या भागात आकडा टाकता येणार नाही. थेट खांबावरून वीज घ्यावी लागणार असल्याने वीजचोरीला आपसूकच आळा बसला जाणार आहे. तांत्रिक गळती थांबविण्यासाठी सहा किमी अंतरावरील ११ केव्हीचे कन्डक्टर बदलण्यात येत आहेत. खराब झालेल्या ३० पैकी २७ वितरण वाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. सोबतच २०० केव्हीच्या १४ पैकी १२ वाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. लोड वाढताच वारंवार होण्यार्‍या खंडीत विद्युत पुरवठ्यासाठी ‘एअर ब्रेक’ टाण्यात येत आहेत. २० ठिकाणी हे ब्रेक टाकण्यात येणार असून आजपर्यंत १७ ठिकाणचे काम पूर्णत्वास गेले आहे. शहरातील जुनाट तारा तुटून अपघात होण्याची शक्यता असल्याने त्याही बदलण्यात येत आहे. नवीन साहित्य टाकणीचे काम लवकर पूर्ण होणार आहे. त्यानंतर शहरातील तांत्रिक गळती, वीजचोरीवर आळा बसणार आहे. उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता एम.एन.सिरसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

हिंगोली जिल्ह्यात एकूण पाच विभागात गतवर्षी मार्च महिन्यामध्ये १ लाख ३९ हजार ६७७ ग्राहकांची होती नोंद. त्यातील वसमत उपविभागामध्ये सर्वाधिक ४७ हजार कनेक्शन असून त्याखालोखाल हिंगोली उपविभागात ३० हजार ८३४ ग्राहकांची होती नोंद.चोरी अधिक असणार्‍या शहरातील सात नगरांत १० किलोमीटर अंतरावर गत महिन्यापासून टाकल्या जात आहे केबल. आजघडीला आझम कॉलनी, खाजा कॉलनी, सिद्धार्थनगर, इंदिरानगर, खुशालनगर, गारमाळ आणि मंगळवारा भागात ६ किमीपर्यंत केबल टाकण्याचे काम झाले पूर्ण. तांत्रिक गळती थांबविण्यासाठी सहा किमी अंतरावरील ११ केव्हीचे कन्डक्टर येत आहेत बदलण्यात. खराब झालेल्या ३० पैकी २७ वितरण वाहिन्या बदलण्यात आल्या असून सोबतच २०० केव्हीच्या १४ पैकी १२ वाहिन्या आल्या आहेत बदलण्यात. हिंगोली शहरात १७ ठिकाणी टाकण्यात आले एअर ब्रेक.

Web Title: Mahavitaran's Literary Amendment Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.