महाविकास आघाडीचे उमेदवार चव्हाण आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:26 IST2020-11-12T07:26:29+5:302020-11-12T07:26:29+5:30

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण गुरुवार, १२ नोव्हेंबर ...

Mahavikas Aghadi candidate Chavan will file his nomination papers today | महाविकास आघाडीचे उमेदवार चव्हाण आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

महाविकास आघाडीचे उमेदवार चव्हाण आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, रोहयोमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. विक्रम काळे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाठ, आ. अंबादास दानवे, आ. रमेश बोरणारे, आ. उदयसिंग राजपूत, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कैलास पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, आकाशवाणीजवळ सकाळी ११ वा. चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जलसंपदामंत्री पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

Web Title: Mahavikas Aghadi candidate Chavan will file his nomination papers today