शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मराठवाड्यास महात्मा फुलेंचा पदस्पर्श; औरंगाबाद ते पैठण रस्ता पहिल्यांदा बांधला जोतिबांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 12:06 IST

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी सातत्याने सत्यशोधक समाजाच्या सभा, बैठकींना महात्मा फुलेंची हजेरी

- विकास राऊत

औरंगाबाद : महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule ) या समतेच्या मार्गाने जाणाऱ्या शांतीदूतांनी औरंगाबाद ते पैठण या रस्त्याची पहिल्यांदा पायाभरणी केली ती १८७० च्या दशकात. सत्यशोधक चळवळीचे केंद्र आणि नाथनगरीकडे जाण्यासाठी पुणे कमर्शियल ॲण्ड कॉन्ट्रॅक्टर या कंपनीकडून महात्मा फुले यांनी निजाम संस्थानाच्या काळात त्या रस्त्याचे काम केले. (The road from Aurangabad to Paithan was built for the first time by Mahatma Jyotibani Fule) 

यानिमित्ताने महात्मा फुले यांचा मराठवाड्यात पदस्पर्श झाला. पुढे कन्नड, जालना, चौसाळा, उदगीर, निलंग्यासह पूर्ण मराठवाड्यात सत्यशोधक समाज ही चळवळ वाढली, त्या निमित्ताने फुले यांचे या विभागात येणे-जाणे राहिले. पुण्यावरून औरंगाबादकडे येताना वन गार्डन पूल १८६९ साली बांधण्यात आला. कात्रजचा बोगदा त्यांच्या कंपनीने बांधला आहे. त्यांच्या कंपनीने राज्यभर रस्त्यांची कामे केली. सयाजी महाराजांचा बडोद्यातील राजवाडा, मुंबई मनपाचे मुख्यालय, एका इंग्रजी वृत्तपत्राचे मुंबईतील कार्यालय, राज्यातील काही धरणांची व कालव्यांची कामेदेखील महात्मा फुले यांच्या कंपनीने केली.

मराठवाडा सत्यशोधक चळवळीचे मोठे केंद्रमराठवाड्याशी फुले यांचा तीनप्रकरणी संबंध आला. सत्यशोधक चळवळ उभी राहिली, त्यावेळी मराठवाडा निजामाच्या आधिपत्याखाली होता. उमरगा, लातूर, उदगीर, उस्मानाबाद, नांदेडपर्यंत सत्यशोधक समाजाची आंदोलने, मेळावे झाले. बीड जिल्ह्यात चौसाळा येथे सत्यशोधक चळवळीचे जलसे होत. जालना, कन्नड ही चळवळीची केंद्रे राहिली. ‘आम्ही पाहिलेले महात्मा फुले’ आणि ‘महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा’ ही दोन्ही पुस्तके शासनाने प्रकाशित केली असून त्यामध्ये फुले यांचा मराठवाड्याशी संबंध व औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या कामाचे विवेचन आहे.- प्रा. हरी नरके, महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक

१८७० च्या दशकांत पैठण रस्त्याचे कामफुले यांच्या कंपनीने निजाम स्टेटकडून काम घेतले होते. पहिल्यांदा त्या रस्त्याचे काम महात्मा फुले यांनी केले. कन्नड येथे सत्यशोधक समाजाची बैठक झाली होती, त्या बैठकीला स्वत: फुले यांनी मार्गदर्शन केले होते. सत्यशोधक जलशांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात चौसाळा येथे काम काही जण करीत असत. तेथून सत्यशोधक चळवळीचा मराठवाड्यात प्रसार झाला. निलंगा, उमरग्यातून आलेले कृष्णाजी भालेकर (जे फुले यांचे अनुयायी होते), यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र चालविले.- डॉ. वि. ल. धारूरकर, सेवानिवृत्त प्रपाठक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडाMarathwadaमराठवाडा