शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीला घृष्णेश्वर मंदिर भाविकांनी फुलणार; वेरूळमध्ये ३६ तास 'नो व्हेईकल झोन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:06 IST

महाशिवरात्रीला घृष्णेश्वर दर्शनाला जाताय? वेरूळमध्ये ३६ तास वाहनांना बंदी, पार्किंगसाठी नवीन जागा जाहीर!

छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. यादरम्यान शनिवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ८ असे ३६ तास वेरुळ गावातील भगवान महावीर चौक ते मालोजी राजे भोसले चौक हा संपूर्ण परिसर ‘नो व्हेईकल झोन’ घाेषित केला आहे. या निर्णयामुळे मंदिरापर्यंत गावातून जाणारा रस्ता मोकळा राहील.

यंदा घृष्णेश्वर मंदिरात राज्यभरातून ५ ते ६ लाख भाविक येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. यादरम्यान परिसरात भाविकांसह वाहनांची मोठी वर्दळ राहते. वेरूळ गावात पार्किंगची पुरेशी सोय व जागा नसल्याने भाविक वेरूळ गावात रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करतात. परिणामी, दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होते. ही बाब लक्षात घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गावातील महावीर चौक ते मालोजी राजे भोसले चौक या दरम्यानच्या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असेल, असे स्पष्ट केले. त्यासाठी दोन्ही चौकांच्या पलीकडे वाहनांच्या पार्किंगसाठी सोय करण्यात आली आहे.

आजपासून १९ फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीत बदलमहाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरूळ गावात वाहतूककोंडी टाळण्यासाठी दि. १४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्याचे पत्रक पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी जारी केले.

असा असेल बदल- कन्नड, वेरूळ, खुलताबाद, दौलताबादमार्गे छत्रपती संभाजीनगर जाणारी वाहने कन्नड, वेरूळ, कसाबखेड फाटा, वरझडी, माळीवाडा, शरणापूर फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.-छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद, खुलताबाद, वेरूळमार्गे कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटा, वेरूळमार्गे कन्नडकडे जातील.-फुलंब्री, सुलतानपूर, खुलताबाद, वेरूळमार्गे कन्नडकडे जाणारी वाहने फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटा, वेरूळ मार्गे कन्नडकडे जातील.

English
हिंदी सारांश
Web Title : Grishneshwar Temple Gears Up; No Vehicles in Verul for Mahashivratri

Web Summary : Grishneshwar temple expects lakhs of devotees for Mahashivratri. Verul will be a 'No Vehicle Zone' for 36 hours. Traffic diversions are in place from February 14-19 to manage the expected crowds and prevent congestion.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMahashivratriमहाशिवरात्रीTrafficवाहतूक कोंडी