महिलांच्या टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:13 IST2018-01-01T00:12:46+5:302018-01-01T00:13:03+5:30
मुंबई येथे १३ जानेवारीपासून सुरू होणाºया बीसीसीआयच्या महिलांच्या टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या संघात मराठवाड्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू श्वेता जाधव, प्रियंका गारखेडे, श्वेता माने, माधुरी आघाव, मुक्ता मगरे यांचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधारपद स्मृती मानधना भूषवणार आहे.

महिलांच्या टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर
औरंगाबाद : मुंबई येथे १३ जानेवारीपासून सुरू होणाºया बीसीसीआयच्या महिलांच्या टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या संघात मराठवाड्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू श्वेता जाधव, प्रियंका गारखेडे, श्वेता माने, माधुरी आघाव, मुक्ता मगरे यांचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधारपद स्मृती मानधना भूषवणार आहे.
महाराष्ट्राचा सलामीचा सामना १३ रोजी मुंबई संघाविरुद्ध होत आहे. १४ जानेवारी रोजी हैदराबाद, १५ जानेवारी रोजी रेल्वे आणि १६ जानेवारी रोजी दिल्ली संघाविरुद्ध महाराष्ट्राची लढत होणार आहे.
महाराष्ट्राचा संघ : स्मृती मानधना (कर्णधार), अनुजा पाटील (उपकर्णधार), देविका वैद्य, मुक्ता मगरे, श्वेता जाधव, माधुरी आघाव, शिवाली शिंदे, तेजल हसबनीस, प्रियंका गारखेडे, उत्कर्षा पवार, कविता पाटील, निकिता भोर, माया सोनवणे, सई पुरंदरे, श्वेता माने. निवड झालेल्या महाराष्ट्र संघातील खेळाडूंचे एमसीएच्या सिनिअर वूमेन्स सिलेक्शन कमिटीचे चेअरमन प्रदीप देशमुख, औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे, सहसचिव शिरीष बोराळकर यांनी अभिनंदन केले आहे. निवड झालेल्या औरंगाबादच्या श्वेता जाधव हिला प्रशिक्षक कर्मवीर लव्हेरा आणि प्रियंका गारखेडे हिला प्रशिक्षक दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.