शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

केरळवर मात करीत महाराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:27 AM

नौशाद शेख आणि अंकित बावणे यांच्या शतकी भागीदारीनंतर अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंडेच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने बिलासपूर येथे आज झालेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत केरळ संघावर तब्बल ९८ धावांनी विजय मिळवला. फलंदाजीत चमक दाखवणाºया अंकित बावणे याने क्षेत्ररक्षणातही आपला विशेष ठसा उमटवताना ५ झेल घेत महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक योगदान दिले. या विजयाबरोबरच महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.

ठळक मुद्देविजय हजारे करंडक : श्रीकांत मुंडेचे ५ बळी, नौशाद-अंकित यांची शतकी भागीदारी

औरंगाबाद : नौशाद शेख आणि अंकित बावणे यांच्या शतकी भागीदारीनंतर अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंडेच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने बिलासपूर येथे आज झालेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत केरळ संघावर तब्बल ९८ धावांनी विजय मिळवला. फलंदाजीत चमक दाखवणाºया अंकित बावणे याने क्षेत्ररक्षणातही आपला विशेष ठसा उमटवताना ५ झेल घेत महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक योगदान दिले.या विजयाबरोबरच महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.ब गटात महाराष्ट्र ६ सामन्यांत ४ विजय आणि १८ गुणांसह अव्वल स्थानी राहिला, तर दिल्लीचा संघ १६ गुुणांसह दुसºया क्रमांकावर राहिला. आज झालेल्या सामन्यात केरळ संघाचा कर्णधार सचिन बेबीने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. त्यानंतर १३.२ षटकांत फार्मात असणारा ऋतुराज गायकवाड (२८), मुर्तुजा ट्रंकवाला (१५), राहुल त्रिपाठी (१५) हे ७६ धावांत परतल्यानंतर अंकित बावणे आणि नौशाद शेख यांनी चौफेर टोलेबाजी करताना महाराष्ट्राच्या धावसंख्येला आकार दिला. या दोघांनी ८३ चेंडूंत १00 धावांची झंझावाती भागीदारी केली. या दोघांनंतर दिव्यांग हिंगणेकर व श्रीकांत मुंडे यांनी २६ चेंडूंत ३९ धावा झोडपताना महाराष्ट्राला ३७ षटकांत ८ बाद २७३ अशी विशाल धावसंख्या गाठून दिली. महाराष्ट्राकडून नौशाद शेखने सर्वाधिक ५६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ७६ आणि अंकित बावणे याने ४१ चेंडूंत ४ चौकारांसह ४३ धावांची झटपट खेळी केली. दिव्यांग हिंगणेकर याने २१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३७ धावांची वादळी खेळी केली. ऋतुराज गायकवाडने ४ चौकारांसह २८, निखिल नाईकने १६, मुर्तुजा ट्रंकवाला व राहुल त्रिपाठीने प्रत्येकी १५ व श्रीकांत मुंडेने ११ धावा केल्या. केरळ संघाकडून वॉरियर आणि अभिषेक मोहन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात केरळचा संघ श्रीकांत मुंढे याच्या धारदार गोलंदाजीसमोर २९.२ षटकांत १७५ धावांत ढेपाळला. पहिल्या स्पेलमध्ये ८ चेंडूंत २ षटकार व एका चौकारांसह १९ धावा काढणाºया अभिषेक मोहनला तंबूत धाडल्यानंतर श्रीकांत मुंढेने दुसºया स्पेलमध्ये प्रारंभी के.बी. कार्तिक व त्यानंतर मोहंमद अझरुद्दीन व फनूस एफ. यांना एकाच षटकांत तंबूत धाडले. अक्षय के.सी. याच्या रूपाने श्रीकांत मुंढेने ५ वा गडी बाद केला. श्रीकांत मुंढेला सत्यजित बच्छावने २, तर अनुपम संकलेचा, निकीत धुमाळ व दिव्यांग हिंगणेकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. केरळकडून संजू सॅमसन याने सर्वाधिक ४८ चेंडूंत ४ चौकारांसह ४६ धावा केल्या. कर्णधार सचिन बेबीने २२ व के.बी. अरुण कार्तिक याने २३ धावांचे योगदान दिले.संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र : ३७ षटकांत ८ बाद २७३.(नौशाद शेख ७६, अंकित बावणे ४३, दिव्यांग हिंगणेकर ३७, ऋतुराज गायकवाड २८. संदीप वॉरियर २/७४, अभिषेक मोहन २/५४, अभिषेक के. सी. १/५०, एफ. फनूस १/५३). विजयी विरुद्धकेरळ : २९.२ षटकांत सर्वबाद १७५. (संजू सॅमसन ४६, सचिन बेबी २२, के. बी. अरुण कार्तिक २३. श्रीकांत मुंढे ५/२६, सत्यजित बच्छाव २/४६, अनुपम संकलेचा १/१७, दिव्यांग हिंगणेकर १/३०, निकीत धुमाळ १/५५).