शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' हे लागलेले विशेषण जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 16:36 IST

परळीत फाईट चांगलीच होणार

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचा सावध पवित्रा 

औरंगाबाद : ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे’असे आपण कधीही म्हटलेलो नाही. एका ठिकाणच्या सभेत पाच वर्षांपूर्वी विनोद तावडे यांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपंकजा मुंडे होतील, असे भाकित केले होते. मात्र, तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचेही स्पष्ट झालेले होते. त्यावेळेपासून आपणाला ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’  हे लागलेले विशेषण काही पाठ सोडत नाही, असा सावध पवित्रा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत घेतला.

मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री

‘नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी भाजप कटीबद्ध’ या मोहिमेतंर्गत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. यात बोलताना त्यांनी भाजप सरकारने पाच  वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांच्या आकडेवारींची माहिती सादर केली. या माहितीनंतर नुकत्याच झालेल्या सावरगाव येथील भगवान भक्तीगडवरील मेळाव्यात पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती. अमित शहा यांचे भाषण सुरु झाल्यानंतर जनतेमधून सतत ‘ पंकजा मुंडे सीएम, पंकजा मुंडे सीएम’ च्या घोषणा देण्यात येत होत्या. याविषयी त्यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, घोषणा देणारे पदाधिकारी नव्हते. तसेच माझ्याही ओळखीचे नव्हते किंवा मी नियोजितही केलेले नव्हते. त्याला माज्या लेखी काहीही महत्व नाही. राज्याच्या कानाकोपऱ्यातुन लोक आलेले होते. त्यांच्या ज्या भावना होत्या. त्याची दखल पक्षाध्यक्षांनी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

केलेल्या कामांबद्दल नेतृत्वाला कौतुक औरंगाबादेतील मेळाव्याला पंतप्रधान, सावरगावला गृहमंत्री आणि आता परळीत प्रचारासाठी पंतप्रधान येणार आहेत. तेव्हा आपणाला भाजप नेतृत्व ओबीसी नेत्या म्हणून सादर करत आहे का? असा प्रश्न केला असता, त्यांनी भाजपात असे काही होत नसते. आपण केलेल्या कामांबद्दल नेतृत्वाला कौतुक असल्यामुळे असे होत असेल, असेही त्यांनी सांगितले.

परळी विधानसभेत टफ फाईट होणारपरळी विधानसभा मतदारसंघात फाईट चांगलीच टफ होणार आहे.  लोकशाहीमध्ये एकतर्फी निवडणूक होत नसते. धनंजयसह इतरही उमेदवार आहे. त्यामुळे अतिआत्मविश्वास बाळगण्याची गरज नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. दोन वेळा बहिणीला दिले आता एकदा भावाला निवडून द्या असे आवाहन धनंजय मुंडे करत असल्याकडे लक्ष वेधले असता, त्यांनी परळी ही काही आमची जहागिरी नाही. एकदा बहिणीला, एकदा भावाला असे काही नसते. जो कामे करेल त्याला लोक संधी देतील, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीparli-acपरळी