शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार प्राध्यापकांच्या भरतीला लागला मुहूर्त; महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये रिक्त पदांची माहिती आली

By राम शिनगारे | Updated: March 26, 2026 20:05 IST

उच्च शिक्षण विभागाचा मोठा निर्णय: १,१७७ अनुदानित महाविद्यालयांत ५ हजार १२ प्राध्यापकांची होणार भरती; जुलै-ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील ५ हजार १२ प्राध्यापकांच्या भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. प्रत्येक अनुदानित महाविद्यालयांमध्ये रिक्त पदांच्या तुलनेत भरण्यात येणाऱ्या जागांचा तपशील मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत विभागीय सहसंचालक कार्यालयांकडून मेलद्वारे महाविद्यालयांना कळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य शासनाने उच्च शिक्षण विभागाअंतर्गत अनुदानित १ हजार १७७ महाविद्यालयांतील १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या विद्यार्थी संख्येच्या आधारे रिक्त प्राध्यापकांपैकी ५ हजार १२ पदांच्या भरतीसाठी मान्यता देण्याचा निर्णय घेतला होता. त्याविषयीचा शासन निर्णय ११ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. तेव्हापासून कोणत्या महाविद्यालयांना किती जागा मिळणार, याविषयीची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. या भरती प्रक्रियेवर विधिमंडळातही चर्चा झाली होती. त्यानुसार महाविद्यालयातील भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांचा तपशील विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी कळविण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. २४ मार्च रोजी राज्यातील सर्वच सहसंचालकांना कार्यालयात थांबण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार संचालक पातळीवरून ऑनलाइन प्रणालीद्वारेच विभागीय स्तरावर कोणत्या महाविद्यालयात किती जागा भरणार याविषयीची माहिती कळविण्यात आली. त्यानुसार राज्यातील १० विभागीय कार्यालयांनी मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत कार्यालयात थांबून संबंधित महाविद्यालयांना रिक्त जागा आणि भरण्याविषयीच्या प्रक्रियेची माहिती ई-मेलद्वारे दिली आहे.

विद्यार्थी संख्या, रिक्त पदानुसार भरती होणारअनुदानित महाविद्यालयात विषयांना १ ऑक्टोबर २०२५ रोजी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, महाविद्यालयातील रिक्त पदांनुसार जागांचे वाटप केले आहे. त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअरच विकसित करण्यात आले असून, त्याद्वारेच जागावाटप करण्यात आल्याची माहितीही उच्च शिक्षण विभागाने दिली आहे.

सहा महिन्यांत भरती प्रक्रिया पूर्ण होणारउच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंतच ५ हजार १२ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यासाठी मंत्रीस्तरावरूनच रोस्टर तपासणीसाठी शिबिरांचे आयोजन करणे, पदांना ऑनलाइन मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय सहसंचालक आणि विद्यापीठे कार्य करीत आहे. येत्या शैक्षणिक वर्षात पदभरती झालेले प्राध्यापक शिकवायला असतील हे नक्की.-डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्चशिक्षण विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : 5,000 Professor Posts Recruitment Begins; Colleges Get Vacancy Details

Web Summary : Recruitment for 5,012 professor posts in aided colleges begins. Colleges received vacancy details via email from regional offices. The process, aimed for completion by July-August, follows government approval and addresses long-awaited faculty needs. Student numbers and vacancies determine allocation.
टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रProfessorप्राध्यापकchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर