शहरं
Join us  
Trending Stories
1
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
2
७ वर्षाचे नाते, मग लग्न, सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले; इंजिनिअरला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल
3
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावाचे स्टँड काढून टाकण्याचे आदेश
4
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
5
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
6
एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले
7
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
8
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
9
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
10
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
11
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
12
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
13
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
14
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
15
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
16
प्रेमाने ‘किसन’ अशी हाक मारणारे कमी झाले, पण दाराबाहेर चपला हीच श्रीमंती!
17
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
18
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
19
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
20
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता

अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 06:59 IST

Maharashtra Assembly Election 2024: भाजप आणि महायुतीचे उमेदवार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे औरंगाबाद पूर्व विधानसभा  मतदारसंघातून तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. २०१४ व २०१९ मध्ये या मतदारसंघातून विजय मिळविल्यानंतर यावेळच्या निवडणुकीत ते हॅट्ट्रिक साधतील की नाही, याकडे सर्वांचे   लक्ष आहे.

- विकास राऊत छत्रपती संभाजीनगर - भाजप आणि महायुतीचे उमेदवार गृहनिर्माण मंत्री अतुल सावेऔरंगाबाद पूर्व विधानसभा  मतदारसंघातून तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. २०१४ व २०१९ मध्ये या मतदारसंघातून विजय मिळविल्यानंतर यावेळच्या निवडणुकीत ते हॅट्ट्रिक साधतील की नाही, याकडे सर्वांचे  लक्ष आहे. महायुतीच्या घटक पक्षांची मेहनत आणि मतदारसंघातील मत विभाजनावरच त्यांच्या हॅट्ट्रिकचा खेळ जमेल. 

यावेळी मतदारसंघात २०१४ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस, एमआयएम आणि भाजप अशी लढत होईल. शिवाय गेल्यावेळी सावे यांच्याविरुद्ध लढलेले एमआयएमचे गफ्फार कादरी यावेळी समाजवादी पक्षाकडून उभे आहेत. वंचित बहुजन आघाडीने मुस्लीम उमेदवार दिला आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या मतांची विभागणी होणार असून त्याचा लाभ अतुल सावे यांना होणार आहे.  

मतदारसंघात धार्मिक ध्रुवीकरण अटळ २०१४ पासून या मतदारसंघात जातीधर्माच्या आधारावर निवडणूक होत असल्याचे दिसते. २०१९ लाही धार्मिक ध्रुवीकरण झाल्याचे दिसले. आता २०२४ साली तिसऱ्या वेळी पुन्हा भाजप आणि एमआयएम हे आमने- सामने येत असल्याने यंदाच्या निवडणुकीतही जातीधर्माचा आधार घेतल्याचे चित्र दिसणार आहे. 

लोकसभेत काय घडले? परिणाम काय? - मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार खा. संदिपान भुमरे हे विजयी झाले.  एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील दुसऱ्या, तर उद्धवसेनेचे  उमेदवार चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. = औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून एमआयएमला ८९ हजार १४३ मते मिळाली होती. खा. भुमरे यांना ६३ हजार २२८, तर खैरे यांना  ३८ हजार ३५० मते मिळाली होती. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देऔरंगाबाद पूर्व मतदारसंघ हा पूर्ण शहरी मतदारसंघ आहे. सिडकोच्या वसाहती मतदारसंघात आहेत. पाणीप्रश्न सर्वाधिक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.   मतदारसंघात झोपडपट्टी व स्लम वसाहती, गुंठेवारी भागात नागरी सुविधांचा अभाव आहे. अतिक्रमणे, वाढते गुन्हेगारी, बेरोजगारीचा कळीचा मुद्दा आहे.

२०१९ मध्ये काय घडले?अतुल सावे   भाजप  (विजयी)                     ९३,९६६   डॉ. गफ्फार कादरी  एमआयएम                 ८०,०३६ कलीम छोटू कुरेशी   समाजवादी पक्ष             ५,५५५नोटा    -    १९५३

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते     टक्के २००९    राजेंद्र दर्डा     काँग्रेस    ४८,१९०       ३९२०१४   अतुल सावे     भाजप     ६४,२२८        ३७२०१९   अतुल सावे     भाजप    ९३,९६६      ४८ 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वAtul Saaveअतुल सावे