शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

द्विभाषिक मुंबई राज्यात मराठवाड्यातून तीन महिला आमदार विधानसभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 15:44 IST

विधानसभा निवडणूक - १९५७ : मराठी व गुजराती भाषा बोलणाऱ्यांच्या द्विभाषिक मुंबई राज्यात मराठवाड्याचा समावेश

ठळक मुद्देमुंबई द्विभाषिक राज्याच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत ५५ महिला उमेदवारत्यातील २२ उमेदवार विजयी झाल्या. काँग्रेस वगळता अन्य एकाही पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नव्हती

- शांतीलाल गायकवाड

औरंगाबाद : भाषावार प्रांतरचनेचे सूत्र मान्य होऊनही महाराष्ट्र व गुजरात मिळून मुंबई हे द्विभाषिक राज्य स्थापन झाले. १९५७ मध्ये झालेल्या या निवडणुकीपूर्वी हैदराबाद राज्यातील मराठवाडा व मध्यप्रदेशातील विदर्भ, गुजरात व सौराष्ट्र वेगळे काढून मुंबई राज्याला जोडले गेले. ३३९ आमदारांच्या या विधानसभेत मराठवाड्यातून तीन महिला आमदारांना जाण्याची संधी मिळाली. १९५२ च्या पहिल्याच निवडणुकीत वैजापुरातून विजयी झालेल्या आशाताई आनंदराव वाघमारे यांना मात्र दुसऱ्य निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागले. 

नव्यानेच स्वतंत्र झालेल्या भारतात या काळात राज्यनिर्मितीची प्रक्रिया वेगात होती. फाजल अली आयोगाने केलेल्या सूचनांनुसार भाषावार प्रांतरचना करण्याचे सूत्र स्वीकारण्यात आले होते. त्यानुसार मराठी भाषा बोलणाऱ्य मराठवाडा व विदर्भाला मुंबई राज्याला जोडण्यात आले. त्यामुळे दुसऱ्य निवडणुकीनंतर औरंगाबादसह मराठवाड्यातील आमदारांना हैदराबादऐवजी मुंबई विधानसभेत समाविष्ट करण्यात आले. 

औरंगाबाद शहरातून काँग्रेसचे मीर महमूद अली यांना मतदारांनी मुंबई राज्याच्या विधानसभेत पाठविले. पीजंट वर्कर्स पार्टीचे काजी सलिमोद्दीन यांचा मीर महमूद यांनी पराभव केला होता. तेव्हा औरंगाबाद शहराचे एकूण मतदार होते फक्त ५२ हजार १७५. त्यातील १६ हजार ६८७ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. मीर महमूद यांना १० हजार ४७५ मते मिळाली. 

विद्यमान दोन आमदार पराभूत, एक विजयीमराठवाडा हैदराबाद राज्यात समाविष्ट असताना  १९५२ मध्ये  विधानसभेची पहिली  निवडणूक झाली. तीत कन्नड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रामगोपाल रामकिसन नावदार हे विजयी झाले होते. १९५७ मध्ये झालेल्या दुसरी निवडणूक नावदार यांनी काँग्रेसच्याच तिकिटावर गंगापूर मतदारसंघातून लढविली; परंतु सीपीआयचे दिगंबरदास चंद्रगुप्ता यांनी त्यांचा केवळ ६१ मतांनी निसटता पराभव केला होता. याचप्रमाणे काँग्रेसच्या आशाताई वाघमारे यांचा पीएसपीचे रामचंद्र महिंद्रनाथ यांनी १९११ मतांनी पराभव केला. नागोराव विश्वनाथराव पाठक यांनी मात्र सतत दुसऱ्यंदा विजय मिळविला. ते दोन्ही वेळेस काँग्रेसच्या उमेदवारीवर सिल्लोड मतदारसंघातून लढले होते. सतत दुसऱ्यंदा आमदारकीचा मान मिळविणारे ते जिल्ह्यातून पहिले आमदार ठरले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार : १९५७विधानसभा मतदारसंघ     विजयी उमेदवार    पक्ष       प्राप्त मतेऔरंगाबाद    मीर महमूद अली                काँग्रेस     १०४७५पैठण    व्यंकटराव जाधव                काँग्रेस            १२२१३गंगापूर     दिगंबरदास चंद्रगुप्ता            सीपीआय        १००५५वैजापूर    महेंद्रनाथ रामचंद्र                 पीएसपी        १४९१८कन्नड     बाबूराव माणिकराव    काँग्रेस         ११५६९सिल्लोड    नागोराव विश्वनाथ पाठक    काँग्रेस       १२५९८    जालना (राखीव)    धोंडिराम गणपतराव    काँग्रेस         १९९२६जालना (सर्वसाधारण)    रुस्तुमजी बेजॉनजी    काँग्रेस           १७९९०अंबड     नाना जेधे         काँग्रेस            ११२३०भोकरदन    भगवंतराव गाडे        काँग्रेस             १४१६१

मराठवाड्यातील महिला आमदारमराठवाड्यातून ४ महिलांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. काँग्रेस वगळता अन्य एकाही पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नव्हती, हे विशेष. चारपैकी तिघी विजयी झाल्या. त्यात शांताबाई रतनलाल (बीड), ताराबाई मानसिंग (कळंब- एससी राखीव) व अंजनाबाई जयवंतराव (हादगाव) यांचा समावेश होता. वैजापूरच्या तत्कालीन आमदार आशाताई आनंदराव वाघमारे यांचा मात्र या निवडणुकीत पराभव झाला. मुंबई द्विभाषिक राज्याच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत ५५ महिला उमेदवार होत्या. त्यातील २२ उमेदवार विजयी झाल्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद