शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

भाजप मेळाव्यात मांगल्याच्या दिव्याला ‘लायटर’चा अग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 19:51 IST

सिगारेट पेटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लायटरचा उपयोग

ठळक मुद्देआगपेटी, मेणबत्तीऐवजी दीप प्रज्वलन केले लायटरने

औरंगाबाद : कुठल्याही साहित्यिक, राजकीय अथवा इतर कोणताही परिसंवाद, शिबीर घेण्याचा कार्यक्रम असो, त्याचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्याची सांस्कृतिक परंपरा आहे. दीप प्रज्वलन हे मांगल्याचे प्रतीक म्हणून संबोधले जाते. परंतु सोमवारी भाजपने घेतलेल्या युवा संवाद कार्यक्रमात या मांगल्याच्या प्रतीकाला (दीप प्रज्वलित करण्यासाठी) आगपेटी, मेणबत्तीऐवजी सिगारेट पेटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लायटरचा उपयोग करण्यात आला. 

भाजपने ‘भगवान कॉलेज आॅफ फार्मसी’येथे कॉफी विथ युथ या युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. युवकांशी संवाद साधण्याच्या या कार्यक्रमाचे दीप प्रज्चलन करण्यासाठी मेणबत्ती आणि माचीस कुठे आहे, म्हणून राज्यमंत्री अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, प्रवीण घुगे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन झवेरी, उपमहापौर विजय औताडे आदी सर्वजण इकडे तिकडे पाहू लागले. पण मेणबत्ती काही  उपलब्ध झाली नाही.  काहींनी कार्यकर्त्यांना मेणबत्तीसाठी आवाजही दिला. मेणबत्ती येत नसल्याचे पाहून शहराध्यक्ष तनवाणी यांनी खिशातून सिगरेट पेटविण्यासाठी असणारा लायटर काढला आणि पुढे होत स्वत:च समईच्या वातीला अग्नी दिला. तनवाणींचा हा पवित्रा पाहून केणेकर ‘हे काय चालले आहे’, असे म्हणू लागले. इतक्यात तनवाणींनी लायटर सावेंकडे देण्याचा प्रयत्न केला. सावे यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर डॉ. कराड यांनीही लायटरनेच दीप प्रज्वलन केले. लायटरने दीपप्रज्वलन केल्याचा प्रकार समोर जमलेल्या युवकांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदाच पाहिल्याने तेही अवाक झाले. काही तरुणांना हा प्रकार पाहून हसू फुटले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाAurangabadऔरंगाबाद