शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस- राष्ट्रवादी मुक्त; सेनेला झाला मोठा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 6:14 PM

७५ वर्षीय हरिभाऊ बागडे यांना काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी कडवी झुंज दिली; पण बागडे नाना पुरून उरले.

- स.सो. खंडाळकर

औरंगाबाद जिल्ह्यात नऊ मतदारसंघ असून, यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचा परफॉर्मन्स फारच वाईट राहिला. त्यामुळे त्यांचा एकही आमदार निवडून येऊ शकलेला नाही. अब्दुल सत्तार यांच्या रूपाने सिल्लोडची जागा  शिवसेनेच्या खात्यावर गेली. मागच्या वेळी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून लढले. ते पराभूत झाले. पण शिवसेनेच्या तिकिटावर लढलेले उदयसिंग राजपूत हे निवडून आले. 

पैठणमधून विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांनी विजयश्री मिळविली. त्यांचेच सहकारी असलेल्या दत्ता गोर्डे यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढविण्यात आले. त्यामुळे संजय वाघचौरे हे नाराज झाले. राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर यांची वैजापूरची जागा त्यांचे पुतणे अभय पा. चिकटगावकर यांनी लढवली; पण ती राखण्यात त्यांना यश आले नाही. 

फुलंब्रीतून यावेळी काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे हे येतील, असा अंदाज व्यक्त होत होता; परंतु विधानसभेचे अध्यक्ष असलेले हरिभाऊ बागडे यांनी चिवट झुंज दिली व ते पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहत विजयी झाले. औरंगाबाद पूर्व, मध्य आणि पश्चिम या मतदारसंघांतही रंगतदार लढती झाल्या. पूर्वमध्ये डॉ. गफार कादरी यांनी जोरदार मुसंडी मारली होती. पण तेथे भाजपचे अतुल सावे विजयी झाले. पश्चिममध्ये अपक्ष राजू शिंदे यांच्यामुळे सेनेसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या; परंतु तेथे सेनेचे संजय सिरसाट विजयी झाले. एमआयएमला मध्यमधील आपली जागा राखण्यात यश आले नाही.

ठळक मुद्दे 1. ७५ वर्षीय हरिभाऊ बागडे यांना काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी कडवी झुंज दिली; पण बागडे नाना पुरून उरले. यावेळी ते पराभूत होतील, हा अंदाज खोटा ठरला.2. लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसचे  असलेले अब्दुल सत्तार हे सिल्लोडमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले.  3. दरवेळी मराठा नेतृत्वातील फाटाफुटीचा फायदा घेऊन गंगापूरमधून भाजपचे प्रशांत बंब निवडून येतात. यावेळी त्यांना अशी संधी न देता शिवसेनेतून आलेले संतोष माने यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे करण्यात आले. तरीही बंब विजयी झाले.4. खूप गाजावाजा होऊनही वंचित बहुजन आघाडीला कुठेच विजय मिळविता आलेला नाही.  5. एमआयएमचा २0१४ मध्ये एक आमदार निवडून आला होता. यावेळी ३ उमेदवार उभे करूनही पराभव पत्करावा लागला.

निवडून आलेले उमेदवार

भाजप1.  औरंगाबाद पूर्व -अतुल सावे२. फुलंब्री - हरिभाऊ बागडे 3. गंगापूर - प्रशांत बंबशिवसेना1. औरंगाबाद मध्य  - प्रदीप जैस्वाल2. औरंगाबाद पश्चिम   - संजय शिरसाट३. सिल्लोड - अब्दुल सत्तार४. पैठण - संदीपान भुमरे५. वैजापूर - प्रा. रमेश बोरनारे६. कन्नड - उदयसिंग राजपूत

पक्षनिहाय आमदार 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा