शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

औरंगाबाद जिल्ह्यात ६ जागा जिंकत शिवसेना ठरला मोठा भाऊ;भाजपच्या ताब्यात ३ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 13:32 IST

जिल्ह्यावर महायुतीचे वर्चस्व कायम

ठळक मुद्देबागडे सहाव्यांदा, भुमरे पाचव्यांदा शिरसाट, बंब यांनी साधली विजयाची हॅट्ट्रिकबोरनारे, राजपूत करणार प्रथमच विधानसभेत प्रवेश

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालानुसार जिल्ह्यावर महायुतीचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले. यात ६ जागांवर शिवसेना, तर ३ जागांवर भाजपने यश मिळविले आहे. औरंगाबाद मध्य हा मतदारसंघ शिवसेनेने एमआयएमकडून खेचून घेतला आहे.  

औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यात थेट लढत झाली. यात सावे यांनी ९३,९६६ मते घेत कादरी यांचा १३ हजार ९३० मतांनी पराभव केला. औरंगाबाद पश्चिममध्ये संजय शिरसाट, अपक्ष राजू शिंदे आणि एमआयएमचे अमित भुईगळ यांच्यात लढत झाली. यात शिरसाट यांनी एकूण ८३,७९२ मते घेत बाजी मारली. मध्यमध्ये यावेळी सेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी ८२ हजार २१७ मते घेत ही जागा एमआयएमकडून खेचून आणली. गंगापूरमध्ये हॅट्ट्रिक साधत भाजपचे प्रशांत बंब यांनी ३४,९७१ मतांनी विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने यांचा पराभव केला.

ग्रामीणमधील निकालाचे चित्र असेअब्दुल सत्तार यांची सरशीसिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख २३ हजार ३८३ मते घेतली आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचा २४ हजार ३८१ मतांनी पराभव केला, तर फुलंब्री मतदारसंघात हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांचा १५,२७४ मतांनी पराभव केला. बागडे यांनी आठ वेळा निवडणूक लढविली असून, पैकी ते सहाव्यांदा निवडून आले.

ग्रामीणमध्येही भगवाचपैठणमध्ये संदीपान भुमरे यांनी १४ हजार १३९ मताधिक्याने पाचव्यांदा विजय मिळविला असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे यांचा पराभव केला आहे. वैजापूरमध्ये सेनेचे रमेश बोरनारे यांनी राष्ट्रवादीचे अभय चिकटगावकर यांचा तब्बल ५८ हजार ८१८ मतांनी पराभव केला. कन्नडमध्ये सेनेचे उदयसिंह राजपूत यांनी अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचा १८ हजार ६९० मतांनी पराभव केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमphulambri-acफुलंब्रीsillod-acसिल्लोडkannad-acकन्नडvaijapur-acवैजापूरgangapur-acगंगापूरpaithan-acपैठणAurangabadऔरंगाबाद