महिलेचा विनयभंग; ग्रामस्थांनी दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:46 IST2017-07-30T00:46:49+5:302017-07-30T00:46:49+5:30
आखाडा बाळापूर : एक २१ वर्षीय विवाहिता पतीसोबत दवाखान्यात जात असताना विवाहितेचा एका तरुणाने विनयभंग केला. पतीने जाब विचारला असता त्याला मारहाण करताना नागरिक जमले व विनयभंग करणाºया तरूणास बेदम चोप दिला

महिलेचा विनयभंग; ग्रामस्थांनी दिला चोप
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : एक २१ वर्षीय विवाहिता पतीसोबत दवाखान्यात जात असताना विवाहितेचा एका तरुणाने विनयभंग केला. पतीने जाब विचारला असता त्याला मारहाण करताना नागरिक जमले व विनयभंग करणाºया तरूणास बेदम चोप दिला. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजंूच्या नागरिकांची मोठी गर्दी ठाण्यासमोर जमली होती.
आखाडा बाळापूर येथील महादेव गल्ली येथील २१ वर्षीय विवाहिता २८ जुलै रोजी रात्री ८.३० वाजेदरम्यान पोट दुखत असल्यामुळे पतीसमवेत दवाखान्यात जात होती.
मराठवाडा चौकातून जात असताना शेख समीर शेख शफी या तरुणाने तिचा विनयभंग केला.
सोबत असलेल्या पतीने ‘तू असे का केले, असे विचारले असता त्याला मारहाण केली व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही झटापट चालू असताना नागरिकांची मोठी गर्दी जमली. महिलेची छेड काढणाºयास संतप्त जमावाने बेदम चोप दिला.
पोलिसांना हे वृत्त कळताच सपोनि केंद्रे, जमादार संजय मार्के, सतीश तावडे यांच्यासह इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला; परंतु जमाव ठाण्यासमोरून हटण्यास तयार नसल्याने हिंगोली येथून अतिरिक्त पोलीस कुमक मागविली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून शेख समीर शेख शफीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे.