शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

महा-ई सेवा केंद्रातील आॅपरेटरचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: September 24, 2014 00:42 IST

जालना : बदनापूर तालुक्यातील हिवरा, रोषणगाव, खामगाव येथे ६० ते ७० ई सेवा केंद्र कोणतीही सूचना न देण्यात आल्याने बंद करण्यात आले आहेत.

जालना : बदनापूर तालुक्यातील हिवरा, रोषणगाव, खामगाव येथे ६० ते ७० ई सेवा केंद्र कोणतीही सूचना न देण्यात आल्याने बंद करण्यात आले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील आॅपरेटर बेरोजगार झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. याचा विचार करत शासनाने ग्रामीण भागात महा ई सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नाममात्र वेतनावर कॉम्प्युटर आॅपरेटरची नियुक्ती करण्यात आली. परंतु काहीही कारण नसताना ही केंद्रे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद करण्यात आली आहेत. आॅपरेटरवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. त्यामुळे कुटुंब कसे चालवावे, असा गंभीर प्रश्न आॅपरेटर समोर उभा राहिला आहे. आमच्याकडून आगाऊ पैसे घेवून दुसरीकडे ही केंद्रे हस्तांतरित करण्याचा डाव काही अधिकारी आखत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. वारंवार पैशाच्या आकड्यात बदल करून आमची पिळवणूक करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. महा ई सेवा केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबतीत अनेक तक्रारी करून देखील अद्यापही न्याय मिळालेला नाही. केंद्रे बंद झाल्याने ग्रामीण भागातील जनेतलाही विविध कागदपत्रांसाठी तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी खेटे मारावे लागत आहेत. जिल्ह्यातील केंद्रातील त्रुटी सांगव्यात ,आम्ही त्या दुरुस्त करु, अशी विनंतीही निवेदनकर्त्यांनी केली आहे. बहुतांश आॅपरेटर्सनी मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी जालना यांना निवेदनाव्दारे तक्रार केली आहे.समस्या निकाली काढण्याची मागणी केली. या निवेदनावर श्रीमंत किशन बरडे, अर्जुन जगन्नाथ उबाळे यांच्यासह इतर केंद्रचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)