मच्छिंद्रनाथांच्या जयघोषाने मायंबा गड भक्तिमय
By Admin | Updated: January 28, 2017 00:48 IST2017-01-28T00:46:02+5:302017-01-28T00:48:11+5:30
धानोरा आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

मच्छिंद्रनाथांच्या जयघोषाने मायंबा गड भक्तिमय
जावेद शेख धानोरा
आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. शुक्रवारी अमावस्येच्या दिवशी लाखो भाविकांनी मच्छिंद्रनाथांचा जयघोष करीत मायंबा गडावरील संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
शुक्रवारी सकाळपासून गडाकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. भाविकांच्या उपस्थितीत गडावर कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांनी यावेळी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अनेक भाविक येथे मुक्कामी दाखल झाले असून, खाऊपासून ते खेळणीपर्यंतची दुकाने लागली आहेत. खरेदीसाठी गर्दी होत आहे. शनिवारी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. यात्रौत्सवाच्या निमित्ताने गडावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, वाहतूक पार्किंगची व्यवस्था समितीने केली आहे. लक्षावधी भाविक गडावर दाखल झाले असल्याचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांनी सांगितले. शुक्रवारी नाथाचा घोडा, रोटे मिरवणूक व निशाण मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्याचा लाभ भाविक भक्तांनी घेतला.