यंत्रणा सज्ज; चौदा टेबलांवर होणार २७ फेर्या
By Admin | Updated: May 14, 2014 23:56 IST2014-05-14T23:33:52+5:302014-05-14T23:56:02+5:30
उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान झाल्यापासून जिल्ह्यात निकालाबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

यंत्रणा सज्ज; चौदा टेबलांवर होणार २७ फेर्या
उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान झाल्यापासून जिल्ह्यात निकालाबाबत तर्कवितर्क लावले जात असून, मतदारसंघाचा सोळावा खासदार कोण, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मतदानाची मतमोजणी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असून, मतमोजणीसाठी प्रशासनही सज्ज झाले आहे. येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात १६ मे रोजी सकाळी ८ वाजता चौदा टेबलांवरून २७ फेर्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जवळपास ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदाची मतदानाची टक्केवारी वाढलेली असल्याने शहरापासून गावा-गावात निकालाबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. अखेर निकालाचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयात सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असून, सुरूवातीला पोस्टल मतांची मोजणी केली जाणार आहे. मतदारसंघातील बुथच्या संख्येनुसार मतमोजणीच्या फेर्या होणार आहेत. त्याचपप्रमाणे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३७० मतदान केंद्रे असल्यामुळे या मतदारसंघात मतमोजणीच्या २७ फेर्या तर औसा आणि उमरगा मतदारसंघाची मतमोजणी २२ फेर्यांत होणार आहे. याशिवाय परंडा आणि उस्मानाबाद मतदारसंघातील मतदान केंद्रावरील मशिनमध्ये बंद असलेल्या मतांची मोजणी २५ फेर्यात तर बार्शीतील २०९ केंद्रांवरील मतमोजणी २३ फेर्यांत पूर्ण होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलाकरिता एक सहाय्यक आणि एक पर्यवेक्षक असे १६८ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. याशिवाय त्यांच्यावर निरीक्षण करणारे व इतर अधिकारी, कर्मचारीही राहणार आहेत. (प्रतिनिधी) मतमोजणी प्रक्रियेतील शासकीय अधिकारी व कर्मचारी, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, पासधारक पत्रका, वार्ताहर, प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठीच्या वाहनतळाची व्यवस्था आयटीआय कॉलेज येथील मोकळ्या मैदानात करण्यात आली आहे. उस्मानाबाद शहरातून येणारे मतमोजणीचे प्रतिनिधी व नागरिकांची वाहने मार्केट यार्डाच्या बाजूला असलेल्या जनावरांच्या बाजाराच्या मैदानात लावली जातील. जिल्ह्यातून बायपास रोडणे मतमोजणी निकाल ऐकण्यासाठी येणार्या वाहनांसाठी सांजा बायपास रस्त्यावरील एरिगेशन कॉलनीच्या बाजूला असलेल्या मैदानावर वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. तुळजापूर, तामलवाडी, नळदुर्ग, उमरगा, औसा, बेंबळी भागातून मतमोजणीसाठी येणारी वाहने ही अमर पॅलेसच्या पाठीमागील बाजूस बेंबळी रोडलगत असलेल्या मोकळ्या मैदानात लावण्यात येणार आहेत.