शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गौडबंगाल! छत्रपती संभाजीनगरात १२५० सिलिंडरवर चालतात ६ हजार फूडकुकिंग आउटलेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:45 IST

घरगुती गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजाराची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : शहरात व ग्रामीण भागात ५ मार्चपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा बंद आहे. हा पुरवठा बंद होऊन २० दिवस होत आले आहेत. या काळात कोळसा शेगड्या व डिझेल शेगड्यांचा वापर करून काही फूडकुकिंग आउटलेट (अन्नपदार्थ शिजवून विक्री करणारी प्रतिष्ठाने) सुरू असल्याचे दिसले.

१२५० व्यावसायिक गॅस सिलिंडरची रोज गरज असल्याचे सरकारी आकडे सांगत असून, या सिलिंडरवर जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाकडे नोंद असलेले ६ हजार फूडकुकिंग आउटलेट कसे चालतात, असा प्रश्न असून, आउटलेट व सिलिंडर यांच्या आकड्यातील तफावत संशयाला वाव निर्माण करणारी आहे. घरगुती सिलिंडरचा वापर तर या आउटलेटमध्ये होत नसेल ना, असा संशय बळावतोय. जिल्हा पुरवठा विभागाने थातूरमातूर कारवाया केल्याचे दिसते.

घरगुती सिलिंडरची ओरड कायमघरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची गॅस एजन्सीसमोरील गर्दी कमी होण्यास तयार नाही. ऑनलाइन नोंदणीची सिस्टम सुरळीत चालत नाही. सिलिंडर नोंदणीनंतर आठवडाभर उलटूनही मिळणे अवघड आहे. अशी परिस्थिती एकीकडे असताना शहर व ग्रामीण भागातील फूडकुकिंग आउटलेट कशावर सुरू आहेत, असा प्रश्न आहे. व्यावसायिक गॅस न मिळाल्यास तारांबळ होईल, अशी ओरड सुरुवातीस झाली; परंतु सध्या फक्त घरगुती गॅसधारक नागरिकांची ओरड दिसते.

जिल्ह्यात ६ हजार नोंदणीजिल्ह्यात ग्रामीण भागात २, तर शहरात ४ हजार ४६ हॉटेल्स, रेस्टाॅरंट, अन्ननिर्मिती केंद्र, केटरिंग, विविध कॅन्टीन, ढाब्यांची अन्न व औषधी प्रशासनाकडे ऑनलाइन नोंद आहे.-दयानंद पाटील, सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन

१२५० व्यावसायिक सिलिंडरची गरजशहरात रोज १२५० व्यावसायिक सिलिंडरची गरज पडते. ५ मार्चपासून व्यावसायिकचा पुरवठा बंद असून, नवीन निर्णयाबाबत सूचना नाही.-जिल्हा पुरवठा विभाग

पुरवठा विभागाने केलेल्या कारवाया१५ मार्च : ६२ हॉटेल तपासले, ३ घरगुती सिलिंडर जप्त.१६ मार्च : १६७ हाॅटेल तपासले, ३८ घरगुती सिलिंडर जप्त.१७ मार्च : ५९ हॉटेल तपासले, ८ घरगुती सिलिंडर जप्त.१८ मार्च : वाळूजमधील एजिस ॲम्फल्स व्हायल्स लि. कंपनीतून रिक्त घरगुती सिलिंडर २२९ व व्यावसायिक १६७ सिलिंडर जप्त.१८ मार्च : ५१ हॉटेल, खानावळ तपासणीत घरगुती सात, तर शहानूरमियाँ दर्गा चौकाजवळ ७६ सिलिंडर जप्त.

व्यावसायिक गॅसचा निर्णय पत्रावरचकेंद्र सरकारने उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला दिलासा देण्यासाठी व्यावसायिक गॅस वाटप ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने २२ मार्च रोजी शासनाला पत्र दिले. जिल्ह्यात औद्याेगिक व व्यावसायिक सिलिंडरबाबत मंगळवारीदेखील शासनाकडून कुठल्याही सूचना पुरवठा विभागाला आल्या नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar: Gas Cylinder Shortage Sparks Food Outlet Suspicion

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar faces gas cylinder shortage. 6,000 food outlets operate with only 1250 cylinders, raising suspicions of domestic cylinder use. Raids reveal illegal use, while commercial gas allocation awaits government directive.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर