शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला कमी ढग व फ्रिक्वेन्सीचा अडसर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 11:57 IST

पाण्याची, पिकांची तरी चिंता मिटावी

ठळक मुद्देमराठवाड्यात पहिल्याच दिवशी प्रयोगाला अडसर‘सी बॅण्ड डॉप्लर’ रडारवर खेळ  

औरंगाबाद : पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असताना जायकवाडी धरणाचा अपवाद सोडला, तर मराठवाड्यातील धरणे अजूनही मृतसाठ्यातच आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शुक्रवारी दुपारी एक वाजता  चिकलठाणा विमानतळावरून ख्याती वेदर मॉडिफिकेशनच्या विमानाने उड्डाण घेतले खरे. मात्र, विरळ ढग आणि फ्रिक्वेन्सी न जुळल्याने  कृत्रिम पाऊस न पाडताच अवघ्या ४५ मिनिटांत विमान खाली उतरले. 

दुष्काळग्रस्त भागात ५२ दिवस कृत्रिम पावसाचे प्रयोग होणार आहेत.  हिंगोली जिल्ह्यात  ४0 टक्क्यांपर्यंत पर्जन्यमान झाले आहे. तर बीड, लातूर आणि उस्मानाबाद हे जिल्हे अजूनही कोरडेच आहेत. ऐन पावसाळ्यात जवळपास ७९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, सर्व १४४ प्रकल्पांपैकी १०३ कोरडेठाक आहेत. जालना जिल्ह्यात सरासरीच्या २५० मिलिमीटर (३५ टक्के) एवढा कमी पाऊस झाला आहे.  औरंगाबाद जिल्ह्यात ४२.६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.  

काय म्हणतात या तंत्रज्ञानाला? क्लाऊड सीडिंग टेक्नॉलॉजी, असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. रेन शेडिंग एरियामध्ये सोडिअमच्या नळकांड्या विमानाच्या साहाय्याने हवेत सोडण्यात येतात. ढगांच्या गर्दीत सोडिअमचा धूर वेगवान हालचाल निर्माण करतो. ढग हलके होऊन त्याच भागात बरसतात.

४८ सोडिअम अ‍ॅण्ड सिल्व्हर आयोडाईडचे ‘एरोसोल्स’ विमानाला दोन्ही बाजूंनी बसविले.दुपारी एक वाजता शास्त्रज्ञांसह विमानाने औरंगाबाद पश्चिमेला उड्डाण भरले. ढगांची गर्दी नसल्याने आणि फ्रिक्वेन्सी न जुळल्याने दोन वाजेच्या सुमारास विमान खाली उतरले. ढगांची गर्दी पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल.

असा पडतो कृत्रिम पाऊस ‘सी बॅण्ड डॉप्लर’ रडार व पावसासाठी वापरण्यात येणारे सोडिअम अ‍ॅण्ड सिल्व्हर आयोडाईडचे ‘एरोसोल्स’, ढगांची गर्दी तपासून त्या दिशने ‘एरोसोल्स’(नळकांड्या) सोडण्यात येतात. ‘सी बॅण्ड डॉप्लर’ या रडारच्या साहाय्याने ढगांचे स्कॅनिंग केले जाते. त्या स्कॅनिंग इमेजमध्ये (फोटो) किती पाणी आहे, पडण्याची क्षमता कशी आहे, किती किलोमीटरच्या रेंजमध्ये ते पाणी पडेल, याचा अंदाज लावण्यात येतो. त्यानुसार विमानाच्या साहाय्याने नळकांड्या ढगात सोडण्यात येतात आणि ते ढग दाटून येऊन त्या भागात पावसाच्या सरी होऊन बरसतात. जगभरामध्ये तीन ते चार देशांमध्ये या महागड्या तंत्राने पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जातो.

‘सी बॅण्ड डॉप्लर’ रडारवर खेळ  ‘सी बॅण्ड डॉप्लर’ या रडारचा नेटवर्क एरिया २५० कि़मी.पर्यंतच्या ढगांपर्यंत आहे. त्यापुढे ४०० कि़मी.पर्यंत हे रडार ढगांतील पाण्याचा शोध घेण्याची क्षमता ठेवते. रडारच्या साहायाने ढगांचे छायाचित्रण केले जाते. स्केल रिफ्रेक्शन्सनुसार ढगांची दिशा कळते. त्या डाटाचे स्कॅनिंग करून त्याचे छायाचित्र हवामान खाते व इतर विभागाला पाठविले जाते. तेथील तज्ज्ञांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर विमानातील पायलट, रडारतज्ज्ञ यांच्या मदतीने ढगांमध्ये सोडिअमच्या नळकांड्या सोडण्यात येतात.

मंत्र्यांना दिसले विदर्भात ढगमराठवाड्यात ‘ट्रायल रन’च्या अनुषंगाने  विमानाचे शुक्रवारी उड्डाण होत नाही तोवरच मंत्रालयातून एका मंत्र्याने विमानतळावर एका शास्त्रज्ञाला फोनवरून विदर्भात ढग असून तिकडे उड्डाण करण्याच्या सूचना केल्या! सी-डॉप्लर रडार अजून कार्यान्वित झालेले नाही, अक्षांश, रेखांश सेटिंग होत नाही, तोवरच विदर्भाकडे प्रयोग करण्याच्या सूचना आल्याने शास्त्रज्ञही गांगरून गेले.

टॅग्स :RainपाऊसDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद