शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात इंधन दरवाढ करून केंद्राकडून जनतेची लुट; केंद्र सरकार विरोधात कॉंग्रेसची जोरदार निदर्शेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 17:24 IST

Fuel prize hike : बैलगाडी व सायकल रँलीस पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ऐनवेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॉंग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

पैठण : पेट्रोल व डिझेलची भाव वाढ करून सर्वसामान्य जनतेला लूटण्याचे एकमेव काम केंद्र सरकारचे सुरू आहे. महामारीच्या काळात भाववाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा नसता मोदी सरकारने चालते व्हावे असा  इशारा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे यांनी पैठण येथे आयोजित कॉंग्रेसच्या आंदोलनात बोलताना दिला. ( Congress's strong protest against the central government)

पेट्रोल डिझेल व गँसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने केंद्र सरकारच्या दरवाढी विरोधात पैठण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी आयोजित बैलगाडी व सायकल रँलीस पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ऐनवेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॉंग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण  काळे, माजी मंत्री अनिल पटेल, प्रदेश सचिव रवींद्र काळे, तालुकाध्यक्ष विनोद तांबे, शहराध्यक्ष तथा गटनेते हसनोद्दीन कटयारे, जिल्हा सरचिटणीस किरण पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर दसपुते, यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी गोरगरीबांना शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, लुटारु मोदी सरकार चले जाव, घरगुती गँस दरवाढ कमी झालीच पाहिजे, मोदी सरकार हाय हाय अशा घोषनांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला. यावेळी  मंडळ अधिकारी शैलेश जोशी व पेशकर राजेश शिंदे, सुनील गुणावत यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

आंदोलनात भिकाजी आठवले, फाजल टेकडी,पाशा मंजन,अंबादास ढवळे, राजू ठाणगे, अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष जुनेद गाजी, संभाजी काटे,रावसाहेब नाडे, अमोल आव्हाड, किरण जाधव, दिनेश श्रीसुंदर, रविंद्र आमले, पवन शिसोदे, भागचंद फोलाने,अजय करकोटक,अज्जु कट्यारे, कल्याण मगरे, तुकाराम लिंबोरे, यांच्यासह युवक कॉंग्रेस,अल्पसंख्याक सेल, सेवादल,ओबिसी सेल, अनुसूचित जमाती सेल तसेच विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते  सहभागी झाले होते. यावेळी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादFuel Hikeइंधन दरवाढ