तुळजापुरात व्यापाऱ्याला लुटले

By Admin | Updated: September 15, 2015 00:32 IST2015-09-14T23:51:10+5:302015-09-15T00:32:35+5:30

तुळजापूर : दिवसभराचे काम संपल्यानंतर वाईन शॉपला कुलूप लावून घराकडे जाणाऱ्या एका व्यापाऱ्यास अडवून तलवारीचा धाक दाखवित चोरट्यांनी ४ लाख १० हजार

Looted a trader after Tuljapur | तुळजापुरात व्यापाऱ्याला लुटले

तुळजापुरात व्यापाऱ्याला लुटले


तुळजापूर : दिवसभराचे काम संपल्यानंतर वाईन शॉपला कुलूप लावून घराकडे जाणाऱ्या एका व्यापाऱ्यास अडवून तलवारीचा धाक दाखवित चोरट्यांनी ४ लाख १० हजार ३५९ रूपयांची रोकड लंपास केली़ ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास तुळजापूर शहरातील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंगळवारपेठ परिसरात घडली. या घटनेने शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथील अमर श्रीराम नाईक यांचे शहरात वाईन शॉपचे दुकान आहे़ श्रीराम नाईक हे रविवारी दिवसभर दुकानात काम केल्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले़ दिवसभर जमा झालेली ४ लाख १० हजारांची रक्कम एका बॅगेत भरून ते दुचाकीवरून घराकडे निघाले होते़ नाईक हे पोलीस ठाण्यापासून पुढे शंभर मीटर अंतरावर मंगळवारपेठ भागात आले असता पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडविले़ नाईक यांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील बॅग हिसकावून घेऊन कमानवेस मार्गाने पोबारा केला़ नाईक यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार सांगितला़ पोलिसांनी सर्व शहराच्या भागात नाकाबंदी केली़ मात्र, पोलिसांना चोरटे सापडले नाहीत़ याबाबत अमर नाईक यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोउपनि रविकांत भंडारी हे करीत आहेत़ या घटनेने शहरासह परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे़

Web Title: Looted a trader after Tuljapur