महिलेला मारहाण करून सिनेस्टाईल लुट
By Admin | Updated: May 22, 2016 00:02 IST2016-05-21T23:50:51+5:302016-05-22T00:02:15+5:30
वाशी : प्रवासासाठी जीपमध्ये बसलेल्या एका महिलेला मारहाण करून, तिच्या मुलांच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत ९ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह

महिलेला मारहाण करून सिनेस्टाईल लुट
वाशी : प्रवासासाठी जीपमध्ये बसलेल्या एका महिलेला मारहाण करून, तिच्या मुलांच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत ९ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ३ हजाराची रोकड लुटारूंनी लंपास केली़ ही खळबळजनक घटना तेरखेडा - वडजी मार्गावर शनिवारी दुपारी घडली असून, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भरदिवसा घडलेल्या या सिनेस्टाईल लुटमारीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी येथील पारा चौकातून अनुराधा अनिल अंधारे (वय-३० रा.माणकेश्वर, ह़मु़) ही महिला शनिवारी दुपारी तिच्या दोन मुलासह मस्सा (ताक़ळंब) येथे जाण्यासाठी निघाली होती़ पारा चौकात एक बोलेरो जीप (क्ऱ एमएच.४५- ८४३९) ही आली होती़ जीपच्या चालकाने अनुराधा अंधारे यांना ‘तुम्हाला कोठे जायचे आहे’ असे विचारले़ अंधारे यांनी मस्सा येथे जायचे असल्याचे सांगितल्यानंतर चालकाने त्यांना जीपमध्ये बसविले़ मात्र, चालकाने जीप दसमेगाव पुढील झिन्नर चौकातून गोजवडा, बावी, तेरखेड्याहून वडजीकडे जाणाऱ्या मार्गावर नेली़ तेथे जीप थांबवून जीपच्या काचा बंद करून अनुराधा अंधारे यांच्या केसाला धरून मारहाण सुरू केली़ तसेच अंगावरील दागिने व पैशांची मागणी लुटारू करू लागले़ अंधारे यांनी दागिने देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या दोन मुलांच्या गळ्यप्रवाशी महिलेची सिनेस्टाईल लूटाला चाकू लावून त्यांना जीवे
मारण्याची धमकी देण्यात आली़ मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर अनुराधा अंधारे यांनी अंगावरील, पर्समधील मिनिगंठण, मोठे गंठण, नेकलेस, कानातील कर्ण व फ ुले आदी ९ तोळ्यांचे दागिने व रोख ३ हजार रुपये काढून दिले़ त्यानंतर लुटारूंनी अंधारे यांना वाटेत सोडून तेथून सिनेस्टाईल पोबारा केला़
त्यानंतर अनुराधा अंधारे यांनी वाशी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ या फिर्यादीवरून अज्ञात तीन लुटारूंविरूध्द वाशी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे़ (वार्ताहर)