कामाच्या शोधात आहात? ग्रामपंचायतीकडे करा अर्ज

By विकास राऊत | Published: February 21, 2024 07:37 PM2024-02-21T19:37:42+5:302024-02-21T19:37:50+5:30

ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यास एका कुटुंबास १०० दिवसाच्या कामाची हमी आहे.

Looking for work? Apply to Gram Panchayat | कामाच्या शोधात आहात? ग्रामपंचायतीकडे करा अर्ज

कामाच्या शोधात आहात? ग्रामपंचायतीकडे करा अर्ज

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या वाढू लागली आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्येही कामे सुरू होण्याची शक्यता रोहयो विभागाने वर्तविली. ६९१७ कामे जिल्ह्यात सुरू असून त्यावर ६८ हजार ५८० मजूर सध्या कार्यरत आहेत. रोहयोवर काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत अर्ज करावा लागणार आहे.

ग्रामपंचायत, सिंचन विहीर, वृक्षलागवड, घरकुल, जनावरांसाठी शेड, शेततळे, मातोश्री पाणंद रस्ते, पेव्हर ब्लॉक, फळबाग, सिमेंट रस्ता, सार्वजनिक विहीर, शाळा संरक्षण भिंत, वनीकरण, रोपवाटिका, तुती लागवड इ. कामांचा यात समावेश आहे. ६९१७ कामांवर ६८ हजार मजुरांच्या हाताला काम ६९१७ कामे जिल्ह्यात सुरू आहेत. त्यावर ६८ हजार ५८० मजूर सध्या कार्यरत आहेत. आगामी काळात ही संख्या वाढणे शक्य आहे.

कोणत्या तालुक्यात किती कामे? 
तालुका....................कामे.....................मजूर
छत्रपती संभाजीनगर.....५१५...................५९४८
गंगापूर...................१३७४...................१४०४७
कन्नड....................५५६.....................२६३२
खुलताबाद...............१७२.....................१५५०
पैठण.....................६३६.....................८९७२
फुलंब्री...................८११......................६६५०
सिल्लोड.................११७५.........................१२८२३
सोयगाव..................२८५..........................१६१४
वैजापूर.................१३९३.........................१४३४४

१०० दिवस कामाची हमी...
ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यास एका कुटुंबास १०० दिवसाच्या कामाची हमी आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे असे कामांचे वर्गीकरण आहे. जॉबकार्डधारकास ग्रामपंचायतीकडे अर्ज करून रोहयोच्या कामासाठी नोंदणी करता येते. पंधरा दिवसांच्या आत संबंधित मजुराला काम देणे क्रमप्राप्त आहे.

कामांचे नियोजन सुरू
जिल्ह्यात रोहयोच्या विविध कामांसाठी नियोजन सुरू आहे. वन, रेशीम, कृषी, जि. प., सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या कामांच्या संख्येत येणाऱ्या काळात वाढ होणे शक्य आहे.
- रोहयो विभाग, छत्रपती संभाजीनगर

Web Title: Looking for work? Apply to Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.