शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

निवडणूक काळात आयकर विभागाची बड्या आर्थिक व्यवहारांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 8:21 PM

काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी निवडणूक विभागासह आयकर विभागाने कंबर कसली आहे.

ठळक मुद्देकाळा पैसा शोधण्यासाठी शीघ्र कृती पथक तयारबँकांनी कॅशव्हॅनला जीपीएस यंत्रणा लावण्याची सूचना

- प्रशांत तेलवाडकर  

औरंगाबाद : १७ व्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक काळात काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी निवडणूक विभागासह आयकर विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात होणाऱ्या मोठ्या आर्थिक व्यवहारावर विभागाची करडी नजर राहणार आहे. काळा पैसा शोधण्यासाठी आयकर विभागाने शीघ्र कृती पथकही तयार केले आहे. तसेच बँकांनाही कडक सूचना दिल्या आहेत की, रोख रकमेची वाहतूक ज्या गाडीतून करणार आहे त्यावर जीपीएस प्रणाली बसविण्यात यावी. याशिवाय व्यवहाराची सर्व महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवावीत. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात आयकर विभागाने राज्यात ६ कोटी रुपये काळा पैसा जप्त केला होता. मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा काळा पैसा वापरण्यात येणार होता. मागील निवडणुकींचा अनुभव लक्षात घेता आयकर विभाग सज्ज झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काळा पैसा शोधण्यासाठी राज्यात ५१ शीघ्र कृती पथके तयार केली आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी एक पथक कार्यरत राहील. या पथकात दोन आयकर अधिकारी व तीन निरीक्षक असतील. मतदारसंघात गैरव्यवहाराची माहिती मिळताच त्या ठिकाणी हे पथक पोहोचून माहितीची पडताळणी करून कारवाई करणार आहे. तसेच आयकर विभागाने सर्व राष्ट्रीयीकृत व खाजगी, नागरी सहकारी बँकांना सूचना दिल्या आहेत. त्या सूचनांची प्रत सर्व बँकांमध्ये पोहोचली आहे.

रिझर्व्ह बँक  नागपूरहून औरंगाबादसाठी रोख रक्कम येथील बँकांच्या ५ करन्सी चेस्टमध्ये पाठवत असते. या करन्सी चेस्टमधून सर्व बँकांना रोख रकमेचा पुरवठा केला जातो. तसेच बँकांच्या शाखांमध्ये दिवसभरात जमा होणारी अतिरिक्त रोख रक्कम करन्सी चेस्टमध्ये जमा करावी लागते. आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव रक्कम घेऊन जाणाऱ्या बँकांच्या वाहनांची तपासणी केली जात नाही. सर्व बँकांकडे स्वत:ची वाहने नसतात, यासाठी आऊटसोर्सिंग करून वाहने घेतली जातात व त्याद्वारे पैशांची वाहतूक केली जाते. मात्र, मागील निवडणुकीत असे निदर्शंनात आले आहे की, आऊटसोर्सिंग केलेल्या वाहनामधूनच काही ठिकाणी काळेधन नेले जात होते. यामुळे बँकांच्या वाहनांवर आयकर विभाग यंदा जास्त लक्ष ठेवणार आहे. सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत की, रोख रकमेची वाहतूक करणारी वाहने बँकांचीच असावी. 

आऊटसोर्सिंग केलेल्या वाहनांवरही जीपीएस प्रणाली बसविण्यात यावी. बँकांनी रोख रकमेची वाहतूक करताना त्या गाडीसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे ठेवणे आवश्यक आहे, तसेच नागरिकांनाही दोन लाखांवरील रक्कम घेऊन जाताना त्यासंदर्भातील बँकेचे पासबुक, व्यवहाराच्या पावत्या सोबत असणे आवश्यक आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यास ती रक्कम जप्त करण्यात येऊ शकते. 

बँका घेतायेत खबरदारी आयकर विभागाचे सूचनापत्र बँकांना प्राप्त झाले आहेत. बँकांच्या वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. रिजर्व्ह बँकेकडून करन्सी चेस्टमध्ये होणारा पतपुरवठा व करन्सी चेस्टमधून बँकांच्या विविध शाखांना केल्या जाणाऱ्या पतपुरवठ्यासाठी वाहने वापरली जातात. काही नागरी सहकारी बँकांकडे किंवा ग्रामीण भागातील बँकांकडे स्वत:ची वाहने नसतात. खाजगी वाहनातून पैशांची वाहतूक केली जाते. अशा वाहनांची नोंद पोलिसांत करण्यात येते व वेळप्रसंगी पोलीस संरक्षणात वाहने आणली जातात. अशा वाहनांनाही जीपीएस बसवावे लागणार आहे, तसेच आवश्यक कागदपत्र व खबरदारी घेतली जात आहे. - अभय जोशी, उपव्यवस्थापक, एसबीआय मुख्य शाखा, क्रांतीचौक

टॅग्स :MONEYपैसाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Income Taxइन्कम टॅक्सElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगbankबँक