लोकमतचा उपक्रम कौतुकास्पद
By Admin | Updated: June 2, 2014 01:04 IST2014-06-02T01:01:04+5:302014-06-02T01:04:50+5:30
नांदेड : येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या प्रांगणात भरविण्यात आलेल्या लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४ मुळे विद्यार्थी आणि पालकांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे़

लोकमतचा उपक्रम कौतुकास्पद
नांदेड : येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या प्रांगणात भरविण्यात आलेल्या लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४ मुळे विद्यार्थी आणि पालकांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे़ लोकमतसारख्या मोठ्या वृत्तपत्र समुहाकडून असलेल्या अपेक्षावरही ते पूर्ण ते उतरले असून हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन समारोपप्रसंगी सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले़ ३० मे ते १ जूनपर्यंत आयोजित लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये राज्यातील अनेक महाविद्यालयांनी आपले स्टॉल लावले़ त्यामुळे नांदेडच्या विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्व महाविद्यालयातील अभ्यासक्रमांची माहिती मिळण्यास मदत झाली़ लोकमतने सातत्याने समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत़ एस्पायर एज्युकेशन फेअरसारख्या उपक्रमांनी लोकमतने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे असेही देशमुख म्हणाले़ तत्पूर्वी आशिष शिरसाठ व होरायझनचे प्राचार्य फनिद्र बोरा यांचे सेमिनार झाले़ तीन दिवसांच्या एज्युकेशन फेअरमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी स्टॉलला भेट देवून माहिती जाणून घेतली़ या एज्युकेशन फेअरचे प्रायोजक रत्नेश्वरी इन्स्टिट्यूट आॅफ पालिटेक्निक विष्णूपुरी, नांदेड हे होते़ तर ग्रामीण सायन्स (व्होकेशनल) कॉलेज, विष्णुपूरी, नांदेड, मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप आॅफ इंस्टीट्यूशन नांदेड, विश्वशांती गुरुकुल स्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज पंढरपूर, श्री गुरु गोविंदसिंघ बी़ जे़ कॉलेज, सिडको, नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णूपुरी, नांदेड, व्हीटसकॉम एज्युसोल्युशन, भाग्यनगर रोड, नांदेड, ढोले पाटील ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट, पुणे, सहयोग एज्युकेशन कॅम्पस, विष्णूपुरी, नांदेड, एस़जी़एम़ विद्यालय, आनंदनगर, नांदेड, लाईफ एज्युकेशन इन्स्टिट्युट, भाग्यनगर रोड, नांदेड, आय़टी़ हब वजिराबाद, नांदेड, सृजन अॅनिमेशन, पुणे, जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्युट आॅफ इंजिनिअरिग अॅन्ड टेक्नॉलॉजी, यवतमाळ, डॉ़ डी़ वाय़ पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्स, आकुर्डी, पुणे, संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी, कोपरगाव, सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्युट पुणे, एम़जी़एम़ कॉलेज, नांदेड, मोशन कोटा नांदेड स्टडी सेंटर, विसावानगर, नांदेड, विज्ञान केंद्र, वारंगा फाटा जि़ हिंगोली आदींनी स्टॉल लावून विद्यार्थ्यांना एकाच छताखाली माहिती उपलब्ध करुन दिली़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना भागवत यांनी केले़ यावेळी सहाय्यक सरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)