लोकमत महाएक्स्पोचे औरंगाबादमध्ये थाटात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:07 IST2018-01-26T00:07:51+5:302018-01-26T00:07:58+5:30
काय आपणास हक्काचे घर पाहिजे, वाहन खरेदी करायचे आहे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फर्निचर वा इंटेरिअर डेकोरेशनचे साहित्य खरेदी करायचे आहे. मात्र, आपणाकडे तेवढा वेळ नाही. मग चिंता करणे सोडा कारण, लोकमत महाएक्स्पोमध्ये आपणास हे सर्व काही एकाच छताखाली मिळत आहे. आपणास विश्वास नाही बसत मग त्वरित या जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या महाएक्स्पोमध्ये. येथेच घरापासून ते सायकलपर्यंत व गृहोपयोगी वस्तूपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्व काही मिळेल.

लोकमत महाएक्स्पोचे औरंगाबादमध्ये थाटात उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : काय आपणास हक्काचे घर पाहिजे, वाहन खरेदी करायचे आहे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फर्निचर वा इंटेरिअर डेकोरेशनचे साहित्य खरेदी करायचे आहे. मात्र, आपणाकडे तेवढा वेळ नाही. मग चिंता करणे सोडा कारण, लोकमत महाएक्स्पोमध्ये आपणास हे सर्व काही एकाच छताखाली मिळत आहे. आपणास विश्वास नाही बसत मग त्वरित या जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या महाएक्स्पोमध्ये. येथेच घरापासून ते सायकलपर्यंत व गृहोपयोगी वस्तूपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्व काही मिळेल.
शहरवासीयांचा वेळ व पैशांची बचत करण्यासाठी पाच प्रकारचे प्रदर्शन पहिल्यांदाच एकाच ठिकाणी एकत्र आणले आहे. गुरुवारी सायंकाळी लोकमत महाएक्स्पोचे उद्घाटन सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांच्या हस्ते पार पडले. या शानदार सोहळ्याचे दीप प्रज्वलन मासिआचे अध्यक्ष सुनील किर्दक, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, क्रेडाईचे अध्यक्ष रवी वट्टमवार, इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जाधव, दर्शन पारसवाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष आशुतोष नावंदर, नरेंद्रसिंग जाबिंदा, विकास चौधरी, विजय सक्करवार, नीलकंठ नागपाल, प्रीतेश धानुका, संतोष धानुका, सौरभ गुप्ता, धवल महेता तसेच व्यापारी महासंघाचे सरदार हरिसिंग, लक्ष्मीनारायण राठी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. क्रेडाईचे अध्यक्ष रवी वट्टमवार यांनी सांगितले की, येत्या काळात घराच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढणार आहेत. भाववाढ आधी भरविण्यात आलेल्या लोकमत महाएक्स्पोमध्ये घर खरेदीच्या सुवर्णसंधीचा लाभ गृहइच्छुकांनी घ्यावा. या प्रदर्शनासाठी बांधकाम व्यावसायिकांनी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. हा दुग्धशर्करा योग असून, घर खरेदीसाठी हा सर्वोत्तम काळ असल्याचेही त्यांनी नमूद केले. सुनील किर्दक म्हणाले की, पूर्वी गृह प्रदर्शन, वाहन प्रदर्शन, फर्निचर प्रदर्शन, इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन असो वा गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन सर्व स्वतंत्र भरत असत; पण पहिल्यांदाच लोकमतने महाएक्स्पोच्या माध्यमातून सर्व कॅटेगरी एकाच छताखाली आणल्या. जगन्नाथ काळे म्हणाले की, लोकांना काय लागते याची जाणीव ठेवून लोकमत सातत्याने विविध उपक्रम राबवीत आहे. प्रत्येक प्रदर्शनाला मिळणाºया उदंड प्रतिसादामुळे त्याचा सकारात्मक परिणाम येथील उद्योग-व्यापारातही दिसून येत आहे. लोकांचे मत जाणणारा लोकमत असा उल्लेख करीत सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ म्हणाले की, लोकमतने भरविलेले प्रत्येक प्रदर्शन नावीन्यपूर्ण असते. उद्योग व व्यवसायाला उभारी देण्यासाठी लोकमतचे प्रदर्शन खूप महत्त्वाची भूमिका बजावते, असे ते म्हणाले. यावेळी लोकमतचे संपादक सुधीर महाजन, लोकमत समाचारचे संपादक अमिताभ श्रीवास्तव, प्रेमदास राठोड, उपाध्यक्ष संदीप बिश्नोई यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
प्रदर्शनाचा आज दुसरा दिवस
लोकमत महाएक्स्पोचा उद्या २६ जानेवारी रोजी दुसरा दिवस आहे. २९ जानेवारीपर्यंत सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या मैदानावर सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. याचा लाभ शहरवासीयांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.