शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

लोकमत महामॅरेथॉन : धावणार नाहीत त्यांनाही देता येणार महामॅरेथॉनमध्ये योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 7:19 PM

धावणार नसाल तरी तुम्हीही होऊ शकता सहभागी

ठळक मुद्दे ‘लोकमत महामॅरेथॉन’ आता अवघ्या ५ दिवसांवर आली आहे. धावपटूंचा उत्साह द्विगुणीत करणे हासुद्धा महामॅरेथॉनचा एक भाग

औरंगाबाद : महाराष्ट्रातील धावपटूंना ज्या स्पर्धेची प्रतीक्षा लागून राहिली आहे ती ‘लोकमत महामॅरेथॉन’ आता अवघ्या ५ दिवसांवर आली आहे. येत्या १५ डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे पहाटे सुरू होणाऱ्या या महामॅरेथॉनसाठी हजारो धावपटूंनी कसून सराव केला आहे. प्रत्यक्ष मॅरेथॉनमध्ये धावून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हे धावपटू आता सज्ज झाले आहेत. लोकमत समूहाच्या पुढाकाराने व धूत ट्रान्समिशन प्रस्तुत महामॅरेथॉनमध्ये सहभागी न होऊ शकलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील शहरवासीयांना नाराज होण्याचे कारण नाही. तुम्हीदेखील तेवढ्याच उत्साहाने या महामॅरेथॉनमध्ये आपले योगदान देऊ शकता. ही महामॅरेथॉन ही औरंगाबादच्या प्रत्येक नागरिकांची आपली महामॅरेथॉन आहे.

महामॅरेथॉनमध्ये धावण्याबरोबरच धावपटूंचा उत्साह द्विगुणीत करणे हासुद्धा महामॅरेथॉनचा एक भाग आहे आणि तो संपूर्ण शहराला पूर्ण करावयाचा आहे. या स्पर्धेत आपलाही सक्रिय सहभाग असणे फार आवश्यक आहे. तो कसा घ्यायचा यासाठी काही ‘आयडिया’ देत आहोत. जे तरुण काही कारणास्तव मॅरेथॉनमध्ये धावू शकणार नाहीत त्यांनी घरी शांत बसू नये. युवक-युवती चेहऱ्यावर रंग लावून, फेटे बांधून, आकर्षक पेहराव करून महामॅरेथॉनच्या मार्गावर येऊ शकतात. तारुण्याचा सळसळता उत्साह धावण्याबरोबरच प्रोत्साहन देण्यातही दिसावा. गतवर्षी महामॅरेथॉनमध्ये शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला होता तो प्रशंसनीयच होता. सलग तीन वर्षे औरंगाबादकरांचे मनापासून प्रेम मिळाल्याने लोकमत महामॅरेथॉन लोकप्रियतेचे शिखर यशस्वीपणे गाठत आहे. तर मग औरंगाबादकरांनो १५ डिसेंबर रोजी रविवारी पहाटे घराबाहेर येऊन महामॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या रनर्सला ‘चिअर अप’ करा. 

औरंगाबादकरांनो वाढवा रनर्सचा उत्साह१जे शहरवासीय मॅरेथॉनमध्ये धावणार नाहीत ते आपल्या घराबाहेर येऊन महामॅरेथॉन मार्गावर उभे राहून धावणाऱ्यांचा उत्साह वाढवू शकतात. तुमच्या प्रोत्साहनाचे शब्द धावपटूंचा उत्साह व ऊर्जा द्विगुणित करतील. त्यांना छोट-छोट्या पेपर ग्लासमध्ये सॉफ्ट ड्रिंक, ज्यूस, लिंब सरबत असे पेयसुद्धा आपण देऊ शकता.२मॅरेथॉन मार्गावर ढोल-ताशा, गाणे-संगीत वाजवून, लेझीम खेळून जल्लोषपूर्ण वातावरण तयार करू शकता. सकाळच्या गुलाबी थंडीत धमाल मस्तीवाले वातावरण असेल तर मॅरेथॉनपटूंचे पाय आणखी वेगाने धावू लागतील. तसेच यानिमित्त बाहेर येणाऱ्या धावपटूंना औरंगाबादकरांचे आदरातिथ्य अनुभवण्याची संधी असेल.३विशेषत: शाळकरी मुलांनी व्यायाम आणि आरोग्याची प्रेरणा घेण्यासाठी सकाळी लवकर उठून मॅरेथॉन मार्गावर उपस्थित राहून मोठ्या उत्साहात धावपटूंचे मनोबल वाढवावे. तुमच्यासोबत आपल्या कुटुंबाला आणि मित्र परिवारालाही सोबत आणा. पालकांनीदेखील आवर्जून मुलांना घेऊन यावे.४रांगोळीचे आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून धावपटूंच्या स्वागतासाठी आपणही महामॅरेथॉन मार्गावर कडेला आकर्षक रांगोळी काढून सजावट करू शकता. रांगोळीतून आरोग्य आणि सामाजिक संदेश दिला तर अधिक उत्तम. संपर्कसाठी 9420922022.

मॅरेथॉनसाठी नोंदणी : रिगल लॉन, लोकमत भवन, जालना रोड, औरंगाबाद येथे करता येईल.अधिक माहितीसाठी 9145711777, 9075098036,9004711378, 9673595595 या क्रमांकांवर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी फेसबुकवर महामॅरेथॉन पेजला भेट द्या. 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनLokmatलोकमतAurangabadऔरंगाबाद