लोकमत औरंगाबाद-पुणे प्रॉपर्टी शोचे आज उद्घाटन

By Admin | Updated: February 14, 2015 00:11 IST2015-02-13T23:54:11+5:302015-02-14T00:11:40+5:30

औरंगाबाद :लोकमतच्या वतीने आयोजित ‘औरंगाबाद-पुणे प्रॉपर्टी शो’चे शनिवारी १४ फेब्रुवारीस उद्घाटन होणार आहे.

Lokmat Aurangabad-Pune property show inaugurated today | लोकमत औरंगाबाद-पुणे प्रॉपर्टी शोचे आज उद्घाटन

लोकमत औरंगाबाद-पुणे प्रॉपर्टी शोचे आज उद्घाटन

औरंगाबाद : गृहइच्छुक ज्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या लोकमतच्या वतीने आयोजित ‘औरंगाबाद-पुणे प्रॉपर्टी शो’चे शनिवारी १४ फेब्रुवारीस उद्घाटन होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे दोन्ही महानगरातील नामांकित बिल्डर्सच्या गृहप्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. शिवाय भेट देणाऱ्या ग्राहकांमधून दर तासाला सोडत काढण्यात येणार आहे. त्यात भाग्यवान विजेत्यास चांदीचे नाणे बक्षीस देण्यात येणार आहे.
प्रोझोन मॉल येथे शनिवारी सकाळी १० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टच्या राष्ट्रीय शहरी विकास समितीचे अध्यक्ष रमेश नागपाल, क्रेडाईचे सचिव रवी वट्टमवार व प्रोझोन मॉलचे अध्यक्ष अनिल इरावने यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या प्रदर्शनात औरंगाबाद व पुण्यातील मिळून ५० बिल्डर्स सहभागी झाले आहेत. प्लॉट, फ्लॅट, रो-हाऊस, ट्विन बंगलोज, आलिशान बंगले, दुकाने यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नामांकित बिल्डर्सच्या वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण गृहप्रकल्पांसोबत, इंटेरिअर डेकोरेटर्स, प्लायवूड वितरक तसेच सुलभ गृहकर्जासाठी बँकांचेही स्टॉल येथे असणार आहेत. एकाच छताखाली दोन महानगरातील गृहप्रकल्पांची माहिती मिळणार असल्यानेही एक सुवर्णसंधी गृहइच्छुकांना प्राप्त झाली आहे. १४ व १५ फेब्रुवारीस प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. याचा लाभ गृहइच्छुकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यासाठी व्हेन्यू पार्टनर म्हणून प्रोझोन मॉल तसेच आऊटडोअर पब्लिसिटीसाठी अभिषेक अ‍ॅडव्हर्टायजर्स हे आहेत.
औरंगाबादेतील
सहभागी बिल्डर्स
शमित बिल्डकॉन, सारा बिल्डर्स, एएनके रिअल इस्टेट अँड भवानी डेव्हलपर्स, नभराज ग्रुप, गजानन लँड डेव्हलपर्स अँड गिरिजा डेव्हलपर्स, पल्मस् रिअ‍ॅलिटी, नागपाल ग्रुप, दिशा ग्रुप, यश कन्स्ट्रक्शन, श्री श्री बालाजी लँड डेव्हलपर्स, कोणार्क बिल्डर्स, निर्माण भारती सिटी सेंटर, अमृत डेव्हलपर्स, भाईश्री व्हेंचर्स, ओएसिस लँडमार्क, आर्च डेव्हलपर्स, मालपानीज्- बत्राज् रेसिडेन्सी वाळूज अँड मालपानी’ज् पुष्पराज रेसिडेन्सी उल्कानगरी, त्रिमूर्ती ग्रुप, व्यंकटेश रिअ‍ॅलिटी, अप्रतिम बिल्डर्स, भाग्यविजय अ‍ॅस्ट्रो वास्तू सोल्युशन, मेट्रोज् फर्निचर सिटी, देवेन रिअ‍ॅलिटी, एम. डी. इन्फ्रास्ट्रक्चर, इम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन्स, जय डेव्हलपर्स.

Web Title: Lokmat Aurangabad-Pune property show inaugurated today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.