गणेश मंडळांसाठी लोकमान्य महोत्सव
By Admin | Updated: August 19, 2016 00:57 IST2016-08-19T00:37:18+5:302016-08-19T00:57:39+5:30
जालना : या वर्षीचा गणेशोत्सव शासनाच्यावतीने लोकमान्य महोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियान लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

गणेश मंडळांसाठी लोकमान्य महोत्सव
जालना : या वर्षीचा गणेशोत्सव शासनाच्यावतीने लोकमान्य महोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियान लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभाग घेणाऱ्या मंडळांना शासनाच्यावतीने तालुका ते राज्य पातळीवर रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे माहिती राज्य महोत्सव समितीचे सदस्य बसवराज मंगरूळे यांनी दिली.
या महोत्सवाची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.
बैठकीस जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे प्रमुख उपस्थित होते. मंगरूळे म्हणाले की, या वर्षीच्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील गणेश मंडळांनी सहभागी होत असताना शासनाच्या लोकमान्य महोत्सवात सहभाग नोंदवावा. या महोत्सवात स्वदेशी, साक्षरता अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, जलसंधारण या पाच विषयावर देखावे सादर करावेत. उत्कृष्ट ठरणाऱ्या गणेश मंडळांच्या देखाव्यांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर बक्षीस देण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरावर प्रथम बक्षीस १ लाख रूपये, दुसरे ७५ हजार तर तिसरे ५० हजार एवढे असणार असून तालुकास्तरावरील प्रथम बिक्षस २५ हजार, दुसरे १५ हजार व तृतीय बिक्षस १० हजार रूपये दिले
जाणार असल्याची माहितीही
त्यांनी या बैठकीत दिली. या कामी विविध विभागाबरोबरच शिक्षण विभागाने हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २६ आॅगस्टपूर्वी आपले आवेदनपत्र दाखल करणे आवश्यक असल्याचेही मंगरुळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)