शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Lok Sabha Election 2019 : इम्तियाज जलील लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूकच लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 7:34 PM

एमआयएम व वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी असतानाही या दोन पक्षांत म्हणावे तसे मनोमिलन किंवा एकीची भावना बळावलेली दिसत नाही.

- स.सो. खंडाळकर  

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद लोकसभेची जागा एमआयएमने हिसकावून घेतल्यानंतर विद्यमान आमदार इम्तियाज जलील हे संभाव्य उमेदवार राहतील, अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच स्वत: जलील यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी लोकसभेऐवजी विधानसभाच लढणार असल्याचे आज ‘लोकमत’जवळ स्पष्ट केले. आता एमआयएमची उमेदवारी कुणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

ही जागा एमआयएमला सुटावी यासाठी जलील यांनी प्रयत्नांची  पराकाष्ठा केली. हैदराबाद गाठून एमआयएमचे सुप्रिमो असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली. एक आमदार व २५ नगरसेवक असलेल्या पक्षाने निवडणूक न लढणे कसे चुकीचे ठरेल, हे त्यांनी पटवून दिले. त्यानंतर वेगाने घडामोडी घडल्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या २२ उमेदवारांची नावे असलेल्या यादीतील माजी न्या. बी.जी. कोळसे पाटील यांचे नाव ३७ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत कटले. त्यांतर अ‍ॅड. बाळसाहेब आंबेडकर यांनी ही जागा एमआयएम लढवेल, असे घोषित केले.

एमआयएमतर्फे आ. इम्तियाज जलील हे लोकसभा निवडणूक लढणार, असे जाहीर झाल्यानंतर विविध तर्कवितर्क सुरू झाले. मुस्लिम समाजातही खळबळ उडाली. मुस्लिम समाजातील बुद्धिजीवी वर्गाने जलील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवायला सुरुवात केली. एमआयएमचे कार्यकर्तेही जलील यांनी विधानसभाच लढवावी, असा आग्रह धरू लागले. 

एमआयएमने देशभरात लोकसभा निवडणुका लढवायच्याच नाहीत, असा धोरणात्मक निर्णय झाला होता. मुस्लिम धर्मगुरूंनीही तशीच सूचना ओवेसी यांना केली होती. त्यामुळेच ओवेसी यांनी, बाळासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुका लढवण्यासंबंधीचे अधिकार वंचित बहुजन आघाडीला देत एमआयएम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली होती. असे असतानाही औरंगाबादच्या जागेचा आग्रह एमआयएमने धरला. औरंगाबादसह मुंबईतील एक जागा एमआयएम  लढेल, असे जाहीर झाले. लोकसभा लढल्यास तुम्ही मोदींना मदत करीत आहात, असा संदेश जाईल, म्हणून अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी ओवेसींना हितोपदेश केला होता, हे येथे उल्लेखनीय. 

एमआयएम व वंचित बहुजन आघाडीत मनोमिलन नाही

खरे तर एमआयएम व वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी असतानाही या दोन पक्षांत म्हणावे तसे मनोमिलन किंवा एकीची भावना बळावलेली दिसत नाही. औरंगाबादच्या वंचित बहुजन आघाडीत जिल्हा कार्यकारिणीवरून धुसफूस सुरू झाली आहे. सुनील वाघमारे यांनी नेमलेल्या कार्यकारिणीवर अनेकांनी अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे प्रवक्ते प्रा. किसन चव्हाण यांनी नुकतीच सुवर्णशिल्पमध्ये झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. एमआयएमला जागा सुटली असली तरी वंचित बहुजन आघाडीचा एखादा उमेदवार येथे उभा राहू शकेल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Imtiaz Jalilइम्तियाज जलीलVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन