उद्योगनगरीतील व्यवसायिकांना लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:28+5:302021-05-05T04:07:28+5:30

:अर्थचक्र थांबल्याने कर्जाचा बोजा वाढण्याची भिती : अर्थचक्र थांबल्याने कर्जाचा बोजा वाढण्याची भीती वाळूज महानगर : कोरोनाच्या संकटामुळे वाळूज ...

Lockdown hits industrialists | उद्योगनगरीतील व्यवसायिकांना लॉकडाऊनचा फटका

उद्योगनगरीतील व्यवसायिकांना लॉकडाऊनचा फटका

:अर्थचक्र थांबल्याने कर्जाचा बोजा वाढण्याची भिती

: अर्थचक्र थांबल्याने कर्जाचा बोजा वाढण्याची भीती

वाळूज महानगर : कोरोनाच्या संकटामुळे वाळूज उद्योगनगरीतील छोटे- मोठे व्यवसाय बंद पडल्याने अर्थचक्र थांबले आहे. परिणामी, कर्जाचा बोजा वाढण्याच्या भीती व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.

वाळूज एमआयडीसीत नामांकित कंपन्यांबरोबर अनेक छोटे उद्योग सुरू असल्याने अनेकांना रोजगारांची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागांतून आलेले कामगार कुटुंबीयांसह या परिसरातील बजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव, सिडको वाळूज महानगर, जोगेश्वरी, वाळूज, कमळापूर, तीसगाव आदी ठिकाणी स्थायिक झाले आहेत. अनेक बेरोजगार तरुण-तरुणी, महिला आदींनी पै- पै जमवून, तसेच बचत गट व बँकांमार्फत कर्ज प्रकरणे करून या परिसरात छोटे-मोठे व्यवसाय थाटून कुटुंबाची उपजीविका भागवीत आहेत. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गत तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात लॉकडाऊन लागू आहे. यामुळे हॉटेल, पानटपरी, भाजी-विक्रते, कापड दुकानदार आदी छोटे व्यवसाय बंद पडले आहेत. छोटे-मोठे व्यवसाय बंद असल्याने या व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लॉकडाऊनचा कालवधी वाढतच असल्याने व व्यवसाय बंद असल्याने कुटुंबांची आबाळ होत आहे. उधारी- उसनवारीही बंद झाल्याने उपजीविका कशी भागवावी, असा प्रश्न अनेक छोट्या व्यावसायिकांना पडला आहे.

लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबल्याने कर्ज घेऊन व्यवसाय थाटणाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. व्यवसाय बंद असल्याने कर्जाची परतफेड करताना बहुतांश छोट्या व्यावसायिकांची दमछाक होत आहे. नियमितपणे कर्ज फेडणे शक्य नसल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. औद्योगिक क्षेत्रात बचत गट व बँकांकडून कर्ज घेऊन व्यवसाय थाटणाऱ्या व्यावसायिकांना लॉकडाऊनची जबर किंमत मोजावी लागत आहे. शासनाकडून आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न नीलेश टेरकर, जावेद शेख, नागेश कुकलारे, दत्तात्रय वर्पे, वाय.एस. शेख या छोट्या व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.

-----------------------

Web Title: Lockdown hits industrialists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.