शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

विनाकारण रस्त्यावर फिरणारे पोलिसांचे ‘लक्ष्य’; लॉकडाऊन काळात शहरात असणार ६२ फिक्स पॉइंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 1:51 PM

Lockdown in Aurangabad औरंगाबाद शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने ३१ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देया काळात पेट्रोलिंगसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत फिक्स पॉइंटवर बॅरिकेडस्‌ लावण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये शहरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस विभागासह, राज्य राखीव पोलीस दल आणि होमगार्ड यांचीही नियुक्ती करण्यात आली असून, ठिकठिकाणी ६२ फिक्स पॉइंट लावण्यात येणार आहेत.

औरंगाबाद शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने ३१ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरातील १७ पोलीस ठाण्यांतर्गत चौकाचौकांत फिक्स पॉइंट लावण्यात येणार आहेत. प्रत्येक फिक्स पॉइंटवर सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान आठ कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी या पॉइंटवर ४ पोलीस कर्मचारी आणि अमलदार तैनात असतील. त्यानुसार सिटीचौक ७, जिन्सी ६, सिडको आणि जवाहरनगर प्रत्येकी ५ , क्रांतीचौक, एमआयडीसी वाळूज, एमआयडीसी सिडको आणि बेगमपुरा प्रत्येकी ४, वेदांतनगर, छावणी, वाळूज, दौलताबाद, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, आणि उस्मानपुरा प्रत्येकी ३, हर्सूल आणि सातारा येथे प्रत्येकी दोन ठिकाणी पॉइंट लावण्यात येणार आहेत. या बंदोबस्तासाठी एकूण २६९ होमगार्डची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या फिक्स पॉइंटवर बॅरिकेडस्‌ लावण्यात येणार आहेत. शिवाय विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय पेट्रोलिंग करण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे. यासाठी ८ पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके त्यांना दिलेल्या कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करणार आहेत. याशिवाय मोटारसायकल पेट्रोलिंग करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आले असून, यासाठी दिवसा ३४ आणि रात्री ३४, असे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. फिक्स पॉइंट पेट्रोलिंगसाठी नेमण्यात आलेल्या पथकांना चोऱ्या, घरफोडी होणार नाहीत याचीही दक्षता घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद