औरंगाबादमध्ये पुन्हा लॉकडाऊन; ३० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत होणार कडक अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 19:53 IST2021-03-27T19:52:46+5:302021-03-27T19:53:53+5:30
Again Lockdown in Aurangabad : अंशत: लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबादमध्ये पुन्हा लॉकडाऊन; ३० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत होणार कडक अंमलबजावणी
औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यात ३० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. यापूर्वी ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन लागू होता. मात्र, यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान, अत्यावश्यक सेवा आणि उद्योगधंदे यांना सूट देण्यात आली आहे.
प्रतिबंधित बाबी :
- ५ पेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी
- मैदाने, बगीचे बंद असतील
- हॉटेल्स, बार, लॉज, बाजार, मार्केट
- सलून , ब्युटी पार्लर
- शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी
- अत्यावश्यक सेवेतील वगळून सार्वजनिक आणि खाजगी प्रवासी वाहतूक
- धार्मिक स्थळे, हॉल, मंगल कार्यालये, सिनेमा गृहे
- मोर्चा , आंदोलने यांना बंदी
- देशी, विदेशी मद्य विक्रीचे दुकाने बंद
हे सुरु :
- किराणा दुकाने सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सुरु
- दुध व्रिकी व वितरण सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत
- अंडी, चिकन, मासे विक्री सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत
- भाजीपाला व फळे विक्री सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत
- मॉल सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत फक्त भाजीपाला आणि किरणासाठी
- पाणी पुरवठा सेवा दुपारी १२ वाजेपर्यंत
- पेट्रोलपंपावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी/अधिकारी यांनाच इंधन मिळेल
- एलपीजी गॅस केवळ घरपोच सेवा
- शेतीच्या मशागतीस मुभा
- शेतीसाठीची ताडपत्री, बी-बियाणे सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत
- खाजगी रुग्णालये, मेडिकल
- ई-कॉमर्स सेवा घरपोच सेवा
- माध्यम संस्था, वर्तमानपत्र वितरण