कोविड लसीकरण केंद्राची जागा उत्कृष्ट हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST2021-01-08T04:07:11+5:302021-01-08T04:07:11+5:30
औरंगाबाद : कोविड लस देण्यासाठी लसीकरण केंद्राची जागा, तेथील सोयी-सुविधा उत्कृष्ट दर्जाच्या असाव्यात. यासाठी जर खासगी बिल्डिंग किंवा हॉटेल ...

कोविड लसीकरण केंद्राची जागा उत्कृष्ट हवी
औरंगाबाद : कोविड लस देण्यासाठी लसीकरण केंद्राची जागा, तेथील सोयी-सुविधा उत्कृष्ट दर्जाच्या असाव्यात. यासाठी जर खासगी बिल्डिंग किंवा हॉटेल प्रतिष्ठान घेण्याची गरज पडली तर ते पण करावे, असे निर्देश आज महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले.
कोविड-१९ लसीकरणासाठी गठित करण्यात आलेली टास्क फोर्सची बैठक आज महापालिकेच्या सभागृहात घेण्यात आली. बैठकीत मार्गदर्शन करताना पाण्डेय यांनी लसीकरण केंद्राची निवड करताना पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, साफ सफाई, पार्किंग, लाइट, इंटरनेट कनेक्शन इत्यादी आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जागेची निवड वॉर्ड अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी करावी. यासाठी जर खासगी रुग्णालय इमारत किंवा हॉटेल घेण्याची गरज पडली तर ते पण आपण घेऊ शकतात, ते म्हणाले.
केंद्रीय आरोग्यमंत्री ८ जानेवारी २०२१ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लसीकरणाबाबत मार्गदर्शन करणार असून लसीकरणासाठी जागेची निवड कोविड ॲपवर लाभार्थ्यांसाठीची माहिती अपलोड करणे आणि मनुष्यबळाचे प्रशिक्षण आदी कामे ०८ जानेवारी २०२१ पूर्वी करून घेण्याचे निर्देश प्रशासकांनी दिले. या मोहिमेत ११८ लसीकरण केंद्रांवर ७७९ मनुष्यबळाचा वापर करण्यात येणार आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब, सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी, सर्व वाॅर्ड अधिकारी, आरोग्य व डॉक्टर्स संघटनेचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.