नाथसागरात महिनाभर पुरेल एवढा जिवंत जलसाठा

By Admin | Updated: June 30, 2014 01:03 IST2014-06-30T00:42:10+5:302014-06-30T01:03:55+5:30

औरंगाबाद : नाथसागरात (जायकवाडी धरण) एक महिना पुरेल एवढा उपयुक्त (जिवंत) जलसाठा आहे.

Live storage for a month | नाथसागरात महिनाभर पुरेल एवढा जिवंत जलसाठा

नाथसागरात महिनाभर पुरेल एवढा जिवंत जलसाठा

औरंगाबाद : नाथसागरात (जायकवाडी धरण) एक महिना पुरेल एवढा उपयुक्त (जिवंत) जलसाठा आहे. त्यानंतर मृतजलसाठ्यातून पाणी उपसा करावा लागेल. पाऊस लांबला तर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. पावसाळा लांबला तर तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक पालिकेला करावे लागण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आज मनपाचे पदाधिकारी आणि अभियंत्यांनी नाथसागराची पाहणी केली.
डाव्या कालव्याशेजारी १४०० आणि ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीसाठी पंपांद्वारे पाणी उपसले जाते. त्या पंपांच्या तोंडाशी गवताचे जाळे झाल्यामुळे पाण्याचा उपसा कमी होतो आहे. परिणामी पाणीटंचाई जाणवत आहे. शहरातील काही वॉर्डांमध्ये पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. जायकवाडीत सध्या पाणीसाठा आहे; परंतु शहरात पाणी येण्यात अनेक अडचणी आहेत. जलवाहिन्यांची गळती, उपसा पंपाजवळ आलेले गवत, यामुळे कमी प्रमाणात पाणी उपसले जात आहे. शहरात पाण्याची मागणी वाढलेली आहे. नाथसागरात एक महिना पुरेल एवढा जिवंत जलसाठा आहे. त्यानंतर मृत जलसाठ्यातून पाणी घ्यावे लागणार आहे, असे महापौर कला ओझा यांनी सांगितले.
आढावा
महापौर कला ओझा यांनी आज उपमहापौर संजय जोशी, सभापती विजय वाघचौरे, सभागृह नेते किशोर नागरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, वीरभद्र गादगे, नगरसेवक महेश माळवतकर, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता यू.जी. शिरसाठ, वसंत निकम यांच्यासह धरणातील पाण्याचा व उपसा पंप केंद्राचा आढावा घेतला.

अपव्यय टाळावा
शहराला गतवर्षी केलेल्या अ‍ॅप्रोच चॅनलमुळे पाणीपुरवठा होईल. त्यामुळे सध्या तरी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही. मात्र, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, अपव्यय टाळावा, असे आवाहन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले.

धरणातील पाणीसाठा
४४५६.०७३ मीटर
जिवंत जलसाठा
४८७.६०९ एम.एम.क्युब
शहराची पाण्याची गरज
४रोज २०० एमएलडी
४येते १३० एमएलडी
पाण्याचे स्रोत
४हर्सूल तलाव, जायकवाडी, विहिरी, हातपंप
गवत काढण्याचे काम सुरू
उपसा पंपांजवळ आलेले गवत पाणबुड्यांच्या मदतीने काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पंपांच्या तोंडाशी गाळ अडकल्यास पाणी उपसण्यास अडचणी येतात, असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले

Web Title: Live storage for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.