तलाठ्याची आत्महत्या
By Admin | Updated: February 13, 2015 00:47 IST2015-02-13T00:38:12+5:302015-02-13T00:47:29+5:30
तुळजापूर : तालुक्यातील जळकोट येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या एका इसमाने गळफास घेवून आत्महत्या केली़ ही घटना गुरूवारी सकाळी घडली असून,

तलाठ्याची आत्महत्या
तुळजापूर : तालुक्यातील जळकोट येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या एका इसमाने गळफास घेवून आत्महत्या केली़ ही घटना गुरूवारी सकाळी घडली असून, याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
पोलिसांनी सांगितले की, तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु़) येथील संजय कुमारराव सोमवंशी (वय-४२) हे जळकोट येथे तलाठी म्हणून कार्यरत होते़ संजय सोमवंशी यांनी गुरूवारी सकाळी नागोबा ते बारूळ मार्गावरील प्रभाकर सोमवंशी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास गुरूवारी सकाळी गळफास घेवून आत्महत्या केली़ याबाबत रमेश सूर्यभान माडजे (रा़तीर्थ बु़) यांनी दिलेल्या माहितीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणाचा तपास सपोफौ दीपक माने हे करीत आहेत़ (वार्ताहर)