शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लाइनमन म्हणाला, साहेब... तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 19:32 IST

लाइनमनचे म्हणणे गांभीर्याने घ्या, विभागीय आयुक्तांनी सूचना केल्यानंतर यंत्रणेकडून आढावा

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेला सुरळीत करण्यासाठी महसूलची यंत्रणा जुंपली असून, बारीक-बारीक मुद्द्यांवर प्रशासन लक्ष देत आहे. वितरण सुरळीत होण्यासाठी लाइनमनच्या बैठकीत एकाने तिसऱ्या दिवशी शहराला पाणीपुरवठा होणे शक्य असल्याचे सांगितले. त्यावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महसूल, एमजेपी व मनपाच्या यंत्रणेला त्याचे म्हणणे गांभीर्याने घेण्याच्या सूचना केल्या. आयुक्तांच्या सूचनेनंतर त्या लाइनमनसोबत तिन्ही यंत्रणेतील प्रमुखांनी वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला. त्या लाइनमनने दिलेल्या सुचनांनुसार, प्रशासन वितरणात किती सुधारणा करणार, याकडे लक्ष लागले आहे.

३१ अधिकाऱ्यांनी शहरातील पूर्ण जलकुंभावरून होणाऱ्या जलवितरण व्यवस्थेचा आढावा घेत, त्यातील त्रुटी, गळती, चोऱ्यांचा अहवाल तयार केला आहे. त्यानंतर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरूवारी लाइनमन्सची बैठक घेतली. फिडर लाइनवर असलेल्या नळजोडण्या ताबडतोब खंडित कराव्यात, याशिवाय शहरातील पाण्याच्या टाक्यांत पुरवठा करण्याकरिता पाणीसाठा होणार नाही, तसेच मेन लाइनवर असलेल्या नळ कनेक्शनला त्वरित मीटर बसविण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले. त्यानुसार, पथकांनी शुक्रवारी कार्यवाही सुरू केली. शहरात होणारा पाणीपुरवठा दोन किंवा तीन दिवसाआड कसा करता येईल, यासाठी लाइनमनच्या सूचना ऐकून घेत, उपाययोजना करण्यात येणार आहेत.

लाइनमनकडे उपाय, बाकीचे काय करत आहेतलाइनमनकडे जर पाणीपुरवठ्यातील त्रुटी दुर करण्याचा उपाय असेल, तर मग बाकीचे अभियंते व इतर यंत्रणा काय करीत आहे, असा सवाल विभागीय आयुक्तांनी उपस्थित केला. अनेक ठिकाणी गळत्या आहेत. मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ कनेक्शन काढण्यात येणार आहेत. पुन्हा जर त्यावर कनेक्शन घेतले गेले, तर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचे केंद्रेकर यांनी सांगितले. येत्या काही दिवसांनी मुख्यमंत्री पुन्हा योजनेच्या कामाचा आढावा घेणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी