शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्य सरले,ना मिळाला निवारा...

By admin | Updated: July 19, 2014 00:45 IST

भारत दाढेल, नांदेड आयुष्य सरले, ना मिळाला निवारा़़़ ना पाहिले न स्वप्न कधी, झोपडीचाच सहारा़़़़ काबाडकष्ट करणाऱ्यांचे स्वप्न तरी काय असते़़़

भारत दाढेल, नांदेडआयुष्य सरले, ना मिळाला निवारा़़़ ना पाहिले न स्वप्न कधी, झोपडीचाच सहारा़़़़काबाडकष्ट करणाऱ्यांचे स्वप्न तरी काय असते़़़ एखादे घऱ मग हे घर उभे करण्यासाठी आयुष्यभर त्याला कष्टच करावे लागते़ परंतु बीएसयुपी योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ शुक्रवारी सांगवी भागातील गौतमनगरातील लाभार्थ्यांना बहुमजली इमारतीत घरकुले वाटप करण्यात आले़ त्यांना चिठ्ठ्या काढून प्लॅटचे नंबर देण्यात आले़ यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता़ सांगवी येथील गौतमनगर भागात उभारण्यात आलेल्या बहुमजली इमारतीत बीएसयुपीच्या २८८ लाभार्थ्यांना यापूर्वीच घरांचे हस्तांतरण करण्यात आले आहे़ झोपडपट्टी निर्मूलन करून बीएसयुपीची उत्कृष्ट वसाहत निर्माण करण्याचे काम करणाऱ्या महापालिकेने आज २४ लाभार्थ्यांना घरकुलांचा ताबा दिला़ महापालिका इमारतीत स्थायी समिती सभापती उमेश पवळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाचे नंबर देण्यात आले़ पावसाळा सुरू असल्याने या भागातील लाभार्थ्यांना वेळेवर घरे देण्याचा प्रयत्न बीएसयुपी विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांच्या पथकाने केला़ मात्र त्यात अडचणी येत होत्या़ उर्वरित लाभार्थ्यांची संख्या अधिक होती़ तर बहुमजली इमारतीत पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या २४ होती़ ४८ घरांची कामे सुरू आहेत़ त्यामुळे कोणत्या लाभार्थ्यांना घरे द्यायचे, हा प्रश्न होता़ अखेर या लाभार्थ्यांच्या चिठ्ठ्या टाकून लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या़ ज्यांना प्लॅटचे नंबर मिळत होते़ त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता़ सभापती पवळे, नगरसेवक अशोक उमरेकर, कार्यकारी अभियंता अंधारे, उपअभियंता प्रकाश कांबळे, वैजनाथ दुनघव, उपअभियंता विश्वनाथ स्वामी, आरसुडे, बंडू उत्तरवार यांनी परिश्रम घेतले़ दोन एकर जागेचा प्रस्ताव रखडलागौतमनगर येथे आणखी घरकुल उभारण्यासाठी लागणारी अतिरिक्त दोन एकर जागा शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ या जागेचा प्रस्ताव महापालिकेने यापूर्वीच दिला असून तो विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे़योजनेचा कालावधी मार्च २०१५ रोजी संपणार आहे़ त्यामुळे ही जागा मिळाल्यास या भागातील लाभार्थ्यांना तातडीने घरकुले देण्याबाबत नियोजन केले आहे़ मात्र या जागेसंदर्भात अद्याप कोणताच निर्णय होत नसल्याने घरकुलांची कामे रेंगाळली आहेत़