शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

2000 रुग्णांना जीवनदायीचा लाभ

By admin | Updated: August 6, 2014 02:23 IST

परभणी : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील २ हजार २९८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत़

परभणी : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील २ हजार २९८ रुग्णांनी उपचार घेतले आहेत़ या रुग्णांच्या उपचारावर आतापर्यंत ५ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़ राज्य शासनाने गोरगरीब नागरिकांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली़ जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ पासून या योजनेला प्रारंभ झाला आहे़ दारिद्र्य रेषेखालील नागरिकांबरोबरच अंत्योदय योजनेतील नागरिक जीवनदायी योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत़ पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबधारकास या योजनेचा लाभ घेता येतो़ जिल्ह्यामध्ये ३ लाख ६० हजार लाभार्थी आहेत़ या योजनेंतर्गत ९७१ आजारांवर दीड लाख रुपयापर्यंत विमा कंपनीच्या माध्यमातून उपचार केला जातो़ महाराष्ट्र शासनाची ही ऐतिहासिक योजना आहे़ जिल्ह्याबरोबरच राज्यात कुठेही रुग्णाला या योजनेमध्ये उपचार घेता येतात़ परभणी जिल्ह्यातील रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाबरोबरच करीम हॉस्पिटल, स्वाती क्रिटीकेअर आणि सिद्धी विनायक रुग्णालय या रुग्णालयामध्ये जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेता येतो. परभणी जिल्ह्यातील २ हजार २९८ लोकांनी आतापर्यंत या योजनेत उपचार करून घेतले आहेत़ त्यात कॅन्सर, हृदयविकार यासारख्या मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांना फायदा झाला आहे़ १० महिन्यांमध्ये या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ जिल्ह्यातील चार केंद्रांवर आतापर्यंत ३३ लाख ३२ हजार रुपयांचे उपचार करण्यात आले आहेत़ त्यापैकी जिल्हा रुग्णालयात ८ लाख ६१ हजार रुपये खर्चाचे उपचार झाले असून, इतर उर्वरित रक्कमेचे उपचार तीन केंद्रांवर झाले. हृदयविकार, कर्करोग यासारख्या मोठ्या आजारांवर उपचार करण्याची क्षमता गोरगरीब नागरिकांना नसते़ अशा वेळी जीवनदायी आरोग्य योजना या नागरिकांसाठी जीवनदायी ठरत आहे़ एकूण ९७१ आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केला जात आहे़ तसेच किडनी बदलण्यासारख्या शस्त्रक्रियेसाठी अडीच लाखांपर्यंत खर्च शासनाकडून केला जाणार आहे़ (प्रतिनिधी)