एलआयसीच्या कारकु नाकडून साडेदहा लाखांचा अपहार
By Admin | Updated: July 1, 2016 00:33 IST2016-07-01T00:27:03+5:302016-07-01T00:33:59+5:30
औरंगाबाद : तारण पॉलिसीवर परस्पर कर्ज उचलून घेऊन एलआयसीमधील एका कारकुनानेच तब्बल १० लाख ४९ हजार ५८४ रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे

एलआयसीच्या कारकु नाकडून साडेदहा लाखांचा अपहार
औरंगाबाद : तारण पॉलिसीवर परस्पर कर्ज उचलून घेऊन एलआयसीमधील एका कारकुनानेच तब्बल १० लाख ४९ हजार ५८४ रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पारदर्शक काम करणाऱ्या एलआयसीच्याच कारकुनाने हा अपहार केल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल जोशी असे आरोपीचे नाव आहे. पुंडलिकनगर रोडवरील रामदास टॉवर येथील ९८ जी या शाखेत जोशी उच्चश्रेणी लिपिक पदावर कार्यरत आहे. एलआयसीच्या ज्या पॉलिसीधारकांनी एलआयसी हौसिंग फायनान्सकडून कर्ज घेतले आणि कर्जाची परतफेड केल्यानंतर जे पॉलिसीधारक तारण उतरवण्याचे विसरले आहेत, अशा पॉलिसीधारकांना आरोपीने शोधून काढले. अशा पॉलिसीधारकांच्या नावे त्याने परस्पर कर्ज घेतले आणि ही रक्कम त्याने स्वत:च्या बँक खात्यात जमा करून घेतली. या प्रकरणाची माहिती एका ग्राहकास समजली, तेव्हा त्याने शाखा व्यवस्थापकास माहिती दिली. व्यवस्थापकाने चौकशी केली. जोशी याने अनेक पॉलिसीवर कर्ज उचलून अपहार केल्याचे त्यांना समजले. प्रकरण पोलीस आयुक्तांपर्यंत गेले. आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना दिले. साबळे आणि सहायक निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, पोहेकॉ विलास कुलकर्णी, विठ्ठल फरताळे, भागवत सुरवाडे, मनोज उईके, प्रकाश काळे, महेश उगले, सचिन संपाळ, दादासाहेब झारगड यांनी चौकशी केली.