...तर रानडुक्कर व रोहीच्या शिकारीचा शेतकऱ्यांना परवाना
By Admin | Updated: July 29, 2015 00:46 IST2015-07-29T00:25:15+5:302015-07-29T00:46:49+5:30
जालना : रानडुक्कर किंवा रोही या वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान होत असल्याची रितसर तक्रार आल्यानंतर २४ तासांत

...तर रानडुक्कर व रोहीच्या शिकारीचा शेतकऱ्यांना परवाना
जालना : रानडुक्कर किंवा रोही या वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान होत असल्याची रितसर तक्रार आल्यानंतर २४ तासांत संबंधित वनक्षेत्र पालाने रितसर परवाना दिला नाही, किंवा नाकारला तर अर्जदार शेतकऱ्यांना परवाना देण्यात आल्याचे गृहीत धरून त्यास शिकार करण्यास मुभा देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने २२ जुलै रोजी दिला आहे.
शेतपिकांचे नुकसान करणाऱ्या रानडुक्कर व रोही या वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्यासंबंधी सुधारित सूचना जारी करण्यास राज्य वन्यजीव मंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्य शासनाने २२ जुलै रोजी निर्णय जाहीर केला. त्या रानडुक्कर किंवा रोही या वन्यप्राण्यापासून शेतपिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी संबधित वनक्षेत्रपाल यांच्याकडे अर्ज देऊन पोच पावती प्राप्त करावी. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबधीत वनक्षेत्रपाल यांनी शाहनिशा करून रानडुक्कर किंवा रोहीची शिकार करण्याबाबत परवाना २४ तासांत जारी करावा. जर तसा परवाना दिला नाही किंवा नाकारला नाही तर अर्जदारास परवाना देण्यात आलेला आहे, असे गृहीत धरून पारध करण्याची मुभा राहिल, असे शासन निर्णयात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
वन्यप्राण्याकडून शेतपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास संबंधितास नुकसान भरपाई देण्याबाबातचा निर्णयही शासनाने घेतला आहे. त्यानुसार शेतपिकांचे १० हजार रूपयांपर्यंत नुकसान झाल्यास पूर्ण किंमत परंतु किमान १००० रूपये अर्थसाह्य, १० हजार पेक्षा जास्त नुकसान झाल्यास भरपाईची ८० टक्के रक्कम, कमाल मर्यादा २५ हजार रूपयांपर्यत, उसाचे नुकसान केल्यास ८०० रूपये प्रतिटन प्रमाणे किमान २५ हजार मर्यादेत, फळबागांसाठी कलमी आंबा ३६०० रूपये प्रतिझाड, केळी १२० रूपये प्रतिझाड देण्यात येईल.