मुक्तीकडून युक्तीकडे!

By Admin | Updated: March 13, 2015 00:43 IST2015-03-13T00:22:49+5:302015-03-13T00:43:34+5:30

संजय तिपाले, बीड दहावी अन् बारावी परीक्षा म्हटले की, ‘टर्निंग पॉर्इंट’ आहे जपून... असा सबुरीचा सल्ला हमखासच दिला जातो. गुणवत्तेच्या कसोटीला सामोरे जाताना कॉप्यांचा ‘शॉर्टकट

From liberation to the trick! | मुक्तीकडून युक्तीकडे!

मुक्तीकडून युक्तीकडे!


संजय तिपाले, बीड
दहावी अन् बारावी परीक्षा म्हटले की, ‘टर्निंग पॉर्इंट’ आहे जपून... असा सबुरीचा सल्ला हमखासच दिला जातो. गुणवत्तेच्या कसोटीला सामोरे जाताना कॉप्यांचा ‘शॉर्टकट’ शोधण्यात बीडची प्रतिमा मलिन झालेली! गेल्या काही वर्षांत कॉपीमुक्ती अभियानातून कॉप्यांचा डाग पुसून टाकण्याचे प्रयत्नही झाले. मात्र, कॉप्या करताना पकडलेल्या बहाद्दरांचा ‘स्कोअर’ वाढतोच आहे. काळानुसार फक्त ‘ट्रेंड’ बदललायं. केंद्रांबाहेरची ‘जत्रा’ ओसरली; पण आतमध्ये सारेच अलबेल आहे, असे नाही. केंद्रांवर मोबाईलच्या सर्रास वापराने गोपनियतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून काही ठिकाणी शिक्षकच ‘कॉपीपुराण’ करत असल्याची माहिती आहे.
बारावी परीक्षेस २१ मार्च तर दहावी परीक्षेला ३ मार्चपासून सुरुवात झाली आहे. बारावीसाठी ८८ केंद्रांवर ३२ हजार ४१५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत तर दहावीसाठी १४३ केंद्रे आहेत. ३९ हजार ८५५ इतके विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी मागील काही वर्षांपासून प्रशासनासह सामाजिक संघटना जनजागृती करत आहेत. मात्र, काही परीक्षार्थी कॉपीमुक्तीला खीळ घालत आहेत.
‘सेफझोन’मुळे बीडकडे ओढा!
काही केंद्रे केवळ कॉप्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पुणे, मुंबईत राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी केवळ सेफझोन म्हणून बीडमध्ये प्रवेश घेतले आहेत.
आष्टी तालुक्यातील काही परीक्षा केंद्रांत नियम डावलून शिक्षक, प्राध्यापक मोबाईल वापरतात. प्रश्नपत्रिका परीक्षार्थ्यांना वाटण्यापूर्वीच मोबाईल कॅमेऱ्यात टिपून ती सोशल मीडियावरुन विशिष्ट लोकांना पाठवायची अन् उत्तरे परीक्षार्थ्यांपर्यंत पोहोचवायची... असा हा सिलसिला राजरोस सुरु होता. इतर केंद्रांमध्येही याच प्रश्नपत्रिकेच्या आधारे उत्तरे पोहोचविली गेल्याचे सूत्रांनी सांगितले. सोशल मीडियाचा गैरवापर होत असताना याची कुठे वाच्यताही झाली नाही.
काळ बदलला तसे कॉप्या करण्याचे नव्या युक्त्याही रुढ झाल्या. आता सूत्र, प्रमेय, सिद्धांत, रासायनीक समीकरणे अशा ढोबळ बाबींच्या काप्या मोठ्या प्रमाणात होतात. त्याचा मजकूर छोटा असल्याने चिठ्ठ्यांची गरज भासेलच असे नाही तर अगदी हात, पायांच्या नखावर, शरीरावर मजकूर लिहिला जातो. त्यामुळे कॉपी पकडली जाण्याची शक्यता कमी असते. बुट, सॉक्समधून कॉप्या केंद्रात नेणारही अनेक परीर्थीही आहेत. शर्टच्या कॉलरमध्येही काहींनी कॉप्या दडविल्या, काहींनी डोक्याला टक्कल करुन टोप्यांखाली कॉप्या लपवून केंद्रप्रमुखांसह भरारीपथकांना ‘टोपी’ लावण्याची भन्नाट शक्कल शोधून काढली आहे. काही बहाद्दरांनी तोंडामध्ये, पेनांमध्ये चिठ्ठी दडवली. काहीजण ‘डबलपॅड’ आणून त्यामधून कॉप्या केंद्रात घेऊन गेले. डेस्कच्याखाली चिंगम लावून कॉप्यांचा स्टॉक करणारे महाभागही आढळले.
कॉप्या करण्यात मुली तरी कशा मागे राहतील? काही मुलींनी ओढणी, बुटात, पेनात कॉप्या लपविल्या. काहींनी हातरुमालाचा आधार घेतला. तळहातावर, नखांवर कॉप्यांचा मजकूर लिहून आणणाऱ्या मुलीही भरारी पथकांना आढळल्या.
४जिल्हा स्तरावर केवळ एकच महिला भरारी पथक आहे. इतर पथकांत महिला अधिकारी असतीलच असे नाही. त्यामुळे मुलींची तपासणी शक्यतो होत नाही, ही बाब ओळखून बरीच मुले कॉप्या मुलींकडेच लपवून ठेवण्यासाठी देतात, असेही एका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
विनाअनुदानीत शाळा अनुदानापात्र होण्यासाठी दहावीच्या निकालाचे गुण पाहिले जातात.
४गुणवत्तेला पाच गुण आहेत. या पाच गुणांसाठी विनाअनुदानीत शाळांचे संस्थाचालक व शिक्षक गुणवत्तेचा आलेख वाढता ठेवण्यासाठी धडपडत असतात.
४गुणवत्त्तेच्या नादात कॉप्यांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले जाते. परिणामी कॉपीमुक्तीला खीळ बसत आहे.

Web Title: From liberation to the trick!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.