बनावट प्रमाणपत्राधारे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

By Admin | Updated: January 8, 2017 23:41 IST2017-01-08T23:38:25+5:302017-01-08T23:41:02+5:30

आष्टी : निलंबित शिक्षक लालासाहेब मल्हारी बळे याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या गुणवत्ता नियंत्रण विभागात नियंत्रक पदावर कार्यरत असल्याचे भासवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला

Letter to Chief Minister directly through fake certificates | बनावट प्रमाणपत्राधारे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

बनावट प्रमाणपत्राधारे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

आष्टी : येथील जि.प. शाळेतील निलंबित शिक्षक लालासाहेब मल्हारी बळे याने नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या गुणवत्ता नियंत्रण विभागात नियंत्रक पदावर कार्यरत असल्याचे भासवून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
बळे याच्या पत्रावर भारत सरकारच्या राजमुद्रेचा बनावट ठसा वापरला गेला असून, अस्तित्वात नसलेल्या पदावर कार्यरत असल्याचे भासविण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने संकेतस्थळावर दिल्लीत असे काही कार्यालय आहे का ? याची खातरजमा केली. मात्र, तसे कार्यालयच अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अधीक्षक अनिल पारसकर यांना पत्र पाठवून चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत बळेचा बनाव उघड झाला. दोन वर्षापासून अनधिकृत गैरहजर राहिल्याने २ सप्टेंबर २०१६ रोजी त्याला सीईओ नामदेव ननावरे यांनी निलंबित केले आहे. शिक्षक म्हणून कार्यरत असताना जून २०१६ मध्ये त्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पत्रातील मजुकराबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (वार्ताहर)

Web Title: Letter to Chief Minister directly through fake certificates