मुलांचे विचारकौशल्य विकसित होऊ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:02 IST2021-04-06T04:02:02+5:302021-04-06T04:02:02+5:30
जागतिक स्वमग्नता दिनानिमित्त सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ संचलित विहंग विशेष मुलांच्या शाळेतर्फे दि. ५ रोजी या कार्यक्रमाचे ...

मुलांचे विचारकौशल्य विकसित होऊ द्या
जागतिक स्वमग्नता दिनानिमित्त सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळ संचलित विहंग विशेष मुलांच्या शाळेतर्फे दि. ५ रोजी या कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी उज्जैनी यांनी ‘मुलांचे विचारकौशल्य’ याविषयी पालकांशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या की, आज कोणते कपडे घालायचे, आपली बॅग कशी ठेवायची, पुस्तकांची रचना कशी करायची, हे मुलांनाच ठरवूद्या. कमीत कमी सूचना देऊन त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित करा. त्यांचे काम त्यांना त्यांच्या पद्धतीने करूद्या. निरीक्षण करणे, प्रत्येक गोष्ट हाताळून पाहणे, या गोष्टींमधून तसेच विविध पारंपरिक खेळांमधूनही मुलांचे विचारकौशल्य विकसित होत असते, असे त्यांनी सांगितले.
डॉ. संजीव सावजी, महेश गुजर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. जयंत सांगवीकर, आभा गोडबोले, वेद जोशी, स्वराज माळी, प्रेयस धर्मापुरीकर, हर्ष शार्दूल यांनी मुलांचे पोस्टर बनविण्यासाठी मदत केली.