स्मार्ट व्हिलेजकडे लोकप्रतिनिधींची पाठ!
By Admin | Updated: February 19, 2015 00:44 IST2015-02-19T00:39:32+5:302015-02-19T00:44:54+5:30
लातूर : पंतप्रधानांच्या स्मार्ट व्हिलेज संकल्पनेकडे लातूरच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याची दिसते़ जिल्हा परिषदेतील ५८ सदस्यांपैकी ३८ सदस्यांनीच स्मार्ट व्हिजेलसाठी गावांची निवड केली आहे़

स्मार्ट व्हिलेजकडे लोकप्रतिनिधींची पाठ!
लातूर : पंतप्रधानांच्या स्मार्ट व्हिलेज संकल्पनेकडे लातूरच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याची दिसते़ जिल्हा परिषदेतील ५८ सदस्यांपैकी ३८ सदस्यांनीच स्मार्ट व्हिजेलसाठी गावांची निवड केली आहे़ उर्वरित २० सदस्यांनी अद्याप गावांची निवड केली नाही़
लातुरात जिल्हा परिषदेच्या वतीने स्मार्ट व्हिलेजचा उपक्रम राबवण्यात येत आहे़ या उपक्रमाचा पुढाकार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा पाटील यांनी घेवून कव्हा येथे या उपक्रमाअंतर्गत स्मार्ट स्कूल, मिशन स्वच्छ भारत अंतर्गत गावातील गावकऱ्यांना शौचालय बांधून देणे सुरू केले आहे़ स्मार्ट व्हिलेज योजने अंतर्गत गाव १०० टक्के निर्मल ग्राम करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, पायाभूत सुविधा, शासकीय कार्यालयांचे व लोकप्रतिनिधींचे बळकटीकरणकरणे , जिल्हा परिषदेच्या शाळेत स्मार्ट स्कूलचा उपक्रम राबविणे, प्रौढ शिक्षणाचे काम घेणे़ नागरिकांच्या आरोग्य सेवा बळकट करणे , जननी सुरक्षा योजना, राजीव गांधी जीवनदायी योजना राबवून पात्र नागरिकांना १०० टक्के आरोग्य कार्डाचे वितरण करणे, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्याविषयी जनजागृती करणे, कुपोषण निर्मूलन व गरोदर मातांना आरोग्य सुविधा पुरविणे , युवकांना सामूहिक खेळ, व्यायाम, व योगाच्या सुविधा उपलब्ध करुनदेणे व त्यांना प्रोत्साहन देणे़ गावात सामाजिक सलोखा राखणे, कृषी विषयक सेवा सुविधा पुरविणे, अशा योजना स्मार्ट व्हिलेज मध्ये राबवण्यात येणार आहेत़ जि़प़च्या ५८ सदस्यांपैकी ३८ सदस्यांनी गावांची निवड केली आहे़ २० सदस्यांनी अद्याप हा उपक्रम हाती घेतला नाही़ (प्रतिनिधी)